ठाणे :  महानगपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी  आंनदाची बातमी असून, कर्मचाऱ्यांना 21500 रूपये दिवाळी बोनस म्हणून जाहीर झाला आहे. ठाणे महानगरपालिकेकडून (Thane Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये (Diwali Bonus)  भरघोस 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. 


दिवाळी निमित्ताने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जातो. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे.  गेल्या वर्षी 18 हजार रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये 20 टक्के वाढ झाली असून 21 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच आशा सेविकांना यंदा 6000 रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे. भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात भरघोस 20 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी वर्गाची दिवाळी गोड झाल्यामुळे आनंदाचे वातावरण असून त्यांनी आभार मानले आहेत.


 यंदाच्या बोनसमध्ये 20 टक्क्यांची भरघोस वाढ


आशा सेविकांना गेल्यावर्षी प्रथमच  पाच हजार रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली होती. यंदा त्यात 20 टक्क्यांची भरघोस वाढ करण्यात आली आहे.तसेच, ठाणे महानगरपालिकेने सन 2021-22 साठी 18 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले होते. त्यातही 3500 रुपयांची म्हणजेच 20 टक्क्यांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. 2022-23 या वर्षासाठी 21500 रुपये देण्यात येणर आहे. धनत्रयोदशीच्या आधी ही भाऊबीज आणि सानुग्रह अनुदान संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्या सोबत सानुग्रह अनुदानाची घोषणेमुळे ठामपा कर्मचारी यांनी आणि ठाणे मुन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष यांनी दिवाळी गोड झाल्यामुळे आयुक्तांचे आभार मानले आहेत.


कर्मचाऱ्यांचा जल्लोष


सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. बोनसच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांनी  महापालिका आयुक्तांचे आभार मानत  ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला.


कल्याण डोंबिवली मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून (Kalyan Dombivali Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त वगळता सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झाला आहे.   गेल्या वर्षी 16 हजार 500 रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये वाढ झाली असून 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. 


हे ही वाचा :


आनंदवार्ता! केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, पण कोणत्या गटातील कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळणार?