Thane Latest News Marathi : नाशिकहुन ठाण्याच्या (Nashik to thane) दिशेने कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात टेम्पोमधील 400 कोंबड्या जागीच ठार झाल्या आहेत. ही घटना मुबई - नाशिक महामार्गवरील पडघा टोल नाक्या नजीक असलेल्या पेट्रोल पंपसमोर घडली आहे. सुदैवाने टेम्पो चालकासह टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांना करकोळ दुखावत झाली आहे. मात्र 400 कोंबड्याचा मृत्यू झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा टेम्पो हा ठाणे (Thane) शहरातील वागळे इस्टेट परिसरातील अजीज चिकन सेंटरच्या मालकाचा आहे. त्यांचा कोंबड्याच्या चिकन विक्रीचा घाऊक व्यवसाय आहे. रोजच्याप्रमाणे नाशिकहुन त्यांच्या बोलेरे कंपनीच्या टेम्पोमध्ये एका पोल्ट्री फार्ममधून 840 कोंबड्याची वाहतूक टेम्पो चालक करीत होता. त्याचवेळी पहाटे सहाच्या सुमारास मुबई - नाशिक महामार्गवरील पडघा टोल नाक्या नजीक असलेल्या पेट्रोल पंप समोर येताच एक कंटेनर अचानक समोर आल्याने भरधाव टेम्पो चालकाने ब्रेक दाबताच (Accident) टेम्पो काही क्षणातच महामार्गवर पटली झाला. या अपघातात (Accident) सुमारे 400 कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
अपघात (Accident) होताच स्थानिकांनी धाव घेतली. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू करून क्रेनच्या साहाय्याने टेम्पो महामार्गावरून हटविण्यात आला. तर पलटी झालेल्या टेम्पोमधून चालकासह दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अजीज चिकन सेंटरच्या मालकाने मृत्यू पावलेल्या (Accident) कोंबड्यांचा खच बाजूला केला व जिवंत कोंबड्या दुसऱ्या टेम्पोमध्ये वाहतूक करण्यात येऊन ठाण्यात (Thane) पोहचवण्यात आल्या.
दरम्यान, मुंबई - नाशिक महामार्गवर बहुतांश ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. याही खड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडतच आहे. मात्र महामार्गावरील खड्डे न बुजवताच पडघा टोल नाक्यावर वाहन चालकांकडून टोल वसुली केली जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अपघाताची नोंद पडघा पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर उद्या शिवसैनिकांचा मोर्चा, विरोध न करण्याचं मानेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
- Hasan Mushrif on Eknath Shinde : आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत जाहीर आभार! चर्चा तर होणारच...
- Dhairyasheel Mane : बंडखोर खासदार धैर्यशील मानेंविरोधात शिवसैनिकांचा कोल्हापुरात मोर्चा, पोलिसांकडून घराच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी