ठाणे : ठाण्यात (Thane) एक भयंकर घटना घडली आहे. ठाण्याच्या कासारवडवली (Kasarvadvali) आनंदनगरमध्ये (AnandNagar) तरूणाची तलवारीने हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्या करून हल्लोखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे कासारवडवली परिसर हादरून गेला आहे. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. रात्री उशीरापर्यंत पोलिस पंचनाम्याचे काम करत होते
ठाण्याच्या कासारवडवली आनंदनगरमध्ये भर रस्त्यात तलवारीने वार करत निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या वृत्ताला पोलिस सूत्रांनी दुजोरा दिला आहे. माहितीनुसार सतीश पाटील असे नाव हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मात्र हत्या मागचे कारण समजू शकलेले नाही किवा हत्या करणाऱ्या आरोपींची नावेही अद्याप समोर आलेली नाही.
गाडीचा दरवाजा उघडून त्यांच्यावर तलवारीने सपासप वार
समोर आलेल्या माहितनुसार, सतीश पाटीलचा इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय होता. पाटील कासरवडवली आनंदनगर परिसरात काही कामानिमित्ताने गेले त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. पाटील त्यांच्या कारमध्ये जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन तरूणांनी त्यांच्या कारसमोर दुचाकी आडवी घालत थांबवले. त्यानंतर गाडीचा दरवाजा उघडून त्यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. सतीश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. वार झाल्यानंतर हल्लेखोर लगेच फरार झाले. परिसरातील नागरिकांना काही कळण्याअगोदर हा प्रकार घडला. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात काही वेळासाठी गर्दी झाली होती.
आष्टीमध्येही चाकूने भोकसून एकाचा खून
बीडच्या आष्टीमध्ये देखील सात वर्षाच्या गुन्ह्यांमध्ये दुसरे आरोपीचे नाव घेतल्याने हैवान काळे याचा सहा जणांनी मारहाण करून चाकूने भोकसून खून केला आहे. हैवान काळे हा आष्टी तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असून, सात वर्षांपूर्वी घडलेल्या एका गुन्ह्यांमध्ये त्याने सहा लोकांची नावे सांगितली होती. त्याच्याच रागातून सहा जणांनी हैवान काळेचा चाकूने वार करून खून केला आहे.
मित्रांसाठी चकना घेऊन गेला तो परतलाच नाही; पूर्ववैमनस्यातून घेतला जीव
भिवंडी (Bhiwandi) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून या तरुणाची हत्या झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर, या युवकाची हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडण्यात आले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत दोघांना ताब्यात घेतले असून, जुन्या वादातून त्यांनी ही हत्या केली असल्याचे समोर येत आहे. योगेश रवि शर्मा (वय 16 वर्ष) असे मयत अल्पवयीन तरुणाचे नाव आहे.