Thane Lok Sabha Constituency : कल्याण आणि ठाणे या दोन जागांसाठी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेत (ShivSena) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अशात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कल्याणची जागा शिवसेनेचीच असल्याची घोषणा केली आहे. सोबतच श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) कल्याण लोकसभा मतदारसंघाचे (Kalyan Lok Sabha Constituency) उमेदवार असणार असल्याचे सुद्धा स्पष्ट केले आहे. मात्र, कल्याणचा निर्णय झाला असतांना ठाणे लोकसभा मतदारसंघ कुणाकडे जाणार याबाबतीत अजूनही स्पष्टता झालेली नाही. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघासाठी भाजप प्रचंड आग्रही आहे.
मुंबईतील लोकसभेच्या जागेवरून भाजप- शिंदेसेनेत संघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळत होते. ज्यात ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरत आहे. कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे इच्छुक असून, ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. अशात भाजपकडून देखील या मतदारसंघावर दावा केला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, श्रीकांत शिंदेंच कल्याण मतदारसंघातून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार असणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे कल्याणचा तिढा सुटला आहे, पण याचवेळी मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाचे काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
ठाण्यासाठी शिंदे आग्रही, भाजप नेत्यांचाही दावा...
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. ठाणे मतदारसंघ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. याच मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश मस्के आणि माजी विधान परिषदेचे रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा आहे. विशेष म्हणजे या तिन्ही नावांना भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. सोबतच भाजप नेत्यांनी या जागेवर दावा केला असून, भाजपचे काही वरिष्ठ नेते सुद्धा यासाठी प्रचंड आग्रही असल्याची चर्चा आहे. तर, भाजपकडून डॉ. संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ युतीत कुणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
कल्याणमधून श्रीकांत शिंदेंचं महायुतीचे उमेदवार : फडणवीस
कल्याण लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार असून, भाजपकडून देखील याच मतदारसंघावर दावा केला जात होता. त्यामुळे कल्याणमधील उमेदवार ठरत नव्हता. मात्र, आता स्वतः फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंचं महायुतीचे उमेदवार असणार असल्याही घोषणा करत हा तिढा संपवला आहे. त्यामुळे लवकरच शिंदे गटाकडून अधिकृतरीत्या श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :