Samata Party on Shivsena Symbol : निवडणूक आयोगाने समता पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये जाहीर झालेल्या नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मशाल हे चिन्ह दिले आहे. याबाबत बोलताना समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तृनाल देवळेकर यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले, तसेच उत्तर प्रदेश मध्ये आम्हाला मशाल चिन्ह मिळाले त्या आधारावर आम्हाला पुन्हा आमचे मशाल चिन्ह मिळेल अशी अपेक्षा आहे.आमच्या पक्षाचं मशाल चिन्ह आमच्या पक्षाला परत देण्यात यावं ही आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे. तसेच उच्च न्यायालयाने आमची याचिका फेटाळली असली तरी येत्या 12 डिसेंबर रोजी पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे .


सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंड झाले, लढाई कोर्टात गेली.. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला चिन्ह दिलं...शिंदे गटाला ढाल तलवार तर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं.....मात्र त्यानंतर समता पार्टीने हरकत घेत 1994 पासून राष्ट्रीयीकृत मशाल हे  चिन्ह आमचे आहे, असा दावा केला होता. याबाबत समता पार्टीकडून निवडणूक आयोगाकडे निवेदन देण्यात आले, उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. याच दरम्यान  उत्तर प्रदेश मध्ये जाहीर झालेल्या नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी 17 तारखेला 17 राजकीय पक्षांना चिन्ह वाटप करण्यात आलं आहे. त्यामध्ये समता पार्टीला पुन्हा मशाल चिन्ह देण्यात आले. याबाबत समता पार्टीचे आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणाल देवळेकर यांनी आज कल्यानमध्ये  पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना देवळेकर यांनी राज्य निवडणुक आयोगाचे आम्ही आभार मानतो. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे देखील आमच्या राष्ट्रीयकृत पक्षाचे जे मशाल चिन्ह आहे ते आम्हाला देण्यात यावं.आमचा मशाल चीन्हावरचा दावा वैध आहे. कोणताही खोटा दावा केलेला नाही, पुन्हा एकदा आमच्या पक्षाला उभारी आणण्याचा प्रयत्न करतोय. येत्या महानगरपालिका ग्रामपंचायत निवडणुकीत देखील आम्ही उमेदवार देणार आहोत. उद्धव ठाकरे गटाला हे मशाल चिन्ह दिलं आहे, त्याला आमचा आजही आक्षेप आहे. याबाबत उच्च न्यायालयात जी दाद मागितली ती याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा सुप्रीम कोर्टात 12 डिसेंबर रोजी याचिका दाखल करनार आहोत. उत्तर प्रदेश मध्ये आम्हाला मशाल चिन्ह मिळाले त्या आधारवर आम्हाला पुन्हा आमचे मशाल चिन्ह मिळेल अशी अपेक्षा आहे.आमच्या पक्षाचं मशाल चिन्ह आमच्या पक्षाला परत देण्यात यावं ही आमची निवडणूक आयोगाकडे मागणी असल्याचे सांगितले .