Python snake, Bhiwandi latest marathi News : भलामोठा अजगर झाड्यावर पाहून गावकऱ्यांची भंमेरी उडाल्याची घटना समोर आली  आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील  चाविंद्रा गावच्या हद्दीत असलेल्या  पोगाव फाटा परिसरातील घडली आहे.  पुरातून वाट काढत हा अजगर जीव वाचविण्यासाठी झाडावर चढला असावा असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सात ते 10 फूट लांब असणाऱ्या अजगराला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. 


मुंबई आणि उपनगरात धो धो पाऊस कोसळत आहे. भिवंडी तालुक्यातही गेल्या दोन दिवसापूर्वी  मुसळधार पाऊस बरसल्याने नदी, नाल्या, ओढ्याना पूर आला होता.  त्यातच आज सकाळच्या सुमारास पोगाव फाटा येथील  एका शेतकऱ्याचे लक्ष झाडाच्या  फादींवर गेले असता त्याला लांबलचक अजगर दिसला. त्याने अजगराला पाहताच झाडावर अजगर असल्याचे गावकऱ्यांनी माहिती दिली. माहिती मिळतच गावातील तरुणांनी अजगराला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.  त्यानंतर स्थानिक गावकऱ्याने  झाडावर भलामोठा अजगर असल्याची  माहिती भिवंडी अग्निशमन दल व आपत्कालीन पथकला  फोन द्वारे कळवले. काही वेळातच भिवंडी  अग्निशामक दल व आपत्कालीन टीम व सर्पमित्र किशोर बजागे  घटनास्थळी  दाखल झाले. या अजगराला तासाभरात रेस्क्यू करण्यात आले. भल्यामोठ्या अजगराला सुखरूप झाडावरून खाली उतरवण्यात आले. 


भिवंडी तालुक्यात  शुक्रवारी पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले.  तर एक जणांचा विहिरीत बुडून मुत्यू झाला.  त्यातच शुक्रवारी भिवंडी तालुक्यात मुसळधार पावसामूळे जंगलातील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याच  पुराच्या प्रवाहात जंगल भागातील भलामोठा अजगर  भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा गावाच्या हद्दीत असलेल्या पोगाव फाटा परिसरात  आला होता. तो  अजगर जीव वाचविण्यासाठी  झाडावर चढला असावा असा अंदाज गावकऱ्यानी व्यक्त केला.  हा अजगर सात ते दहा फूट लांब असून त्याला वन अधिकाऱ्याच्या परवानगीने जंगलात सोडण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी  दिली. पण अजगर पाहण्यासाठी तिथे गावकऱ्यांनी गर्दी केली होती. या अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


पाहा व्हिडीओ :




आणखी वाचा :


India vs Australia Nagpur : सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच 'सोल्ड आऊट', सोशल मीडियावर 'ब्लॅक' मध्ये विक्री जोरात


Mumbai Police : महापालिकेच्या विक्रोळी येथील शाळेतील लहान मुलांच्या अपहरणाची ऑडिओ क्लिप बनावट, मुंबई पोलिसांचा खुलासा