ठाणे : एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही असा नॅरेटिव्ह सेट केला जातोय, असा नॅरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका, आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिलाय. वाघाची डीएनएस टेस्ट केल्यांतरच समजेल असली वाघ कोण आणि नकली वाघ कोण अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर दिली.
राजू पाटील म्हणाले, एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही असा नरेटिव्ह सेट केला जातोय, परंतु असं काही नाही. आजतागायत इतक्या राजकीय घटना घडल्या. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केलाय का? घराच्या शेजारी शपथविधी होता त्यावेळेला सांगितलं नाही. तुम्ही तुमचं राजकारण करा मात्र नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या अनेक निर्णयपैकी हा एक निर्णय आहे. जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब, शिंदे साहेबांनी विचारलं , राज्यसभा असेल विधानसभा असेल अशा वेळेस आम्ही पाठिंबा दिलाय. त्यामुळे असं नाही की आता बिनशर्त पाठिंबा दिलाय.
डीएनए केल्यांनंतर समजेल असली वाघ आणि नकली वाघ
ही लोकसभा निवडणूक वाघाचा डीएनए टेस्ट आहे, आता लवकरच कळेल कोण नकली, कोण असली, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेला, पोकळ डरकाळी फोडून गेला पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत असा टोला नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला होता. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
मनसे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार, श्रीकांत शिंदे यंदा हॅट्रिक करतील, मोठ्या बहुमताने निवडून येतील असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला. 26 तारखेनंतर प्रचाराला वेग येणार आहे, त्या अनुषंगाने येत्या 26 तारखेच्या आधी अविनाश जाधव आणि मी मेळावे घेणार आहोत, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्आ उमेदवाराना आमंत्रित करणार आहोत असं राजू पाटलांनी सांगितले .
ही बातमी वाचा: