Geeta Jain Case: मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्याले केलेल्या मारहाणीवरुन आता राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत असताना लोकप्रतिनिधी आपला संयम सोडला नसला पाहिजे अशी प्रतिक्रिया येत आहे. त्यावर आता आमदार  गीता जैन यांनी मात्र महिलांचा अपमान जो कुणी करेल त्याला मी चोपणाराच अशा भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येतय. 


मंगळवार दिनांक 20 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजता काशिमीराच्या पेणकर पाडा येथे अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यास गेलेल्या कनिष्ठ अभियंता शुभंम पाटील आणि संजय सोनी याला तोडक कारवाई का केली याचा जाब विचारत  आमदार गीता जैन यांनी  शुभम पाटीलचा शर्ट खेचून, चक्क कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला होता.


पालिकेने कुटुंब राहत असलेल्या घरावर तोडक कारवाई करण्यासाठी जे पथक पाठवले होते, त्या पथकात हे अभियंताही सहभागी होते. त्यामुळे संतापलेल्या आमदार गीता जैन यांनी अभियंत्याची कानउघडणी करत कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर राज्यभरातील राजकारण्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 


काय आहे प्रकरण?


मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातील पांडुरंग वाडी, पेणकर पाडा, येथे सुरेंद्र उपाध्याय यांनी राजीव कुमार सिंग यांच्या अनधिकृत बांधकामावर तोडक  कारवाईसाठी  अर्ज दिला होता. त्यावर कारवाई साठी पालिकेच अनधिकृत बांधकाम पथक दिनांक 14 जून 2023 रोजी गेले होते. त्या दिवशी आमदार गीता जैन यांचा फोन आल्याने पथक माघारी फिरले. वास्तविक राजीव कुमार सिंग यांनी सुरेंद्र उपाध्याय यांच्या जागेवर अतिरिक्त जागेवर अतिक्रमण केलं होतं. ते अतिक्रमण हटवण्याचं पत्र  उपाध्याय यांनी दिलं होतं. मात्र गीता जैन यांनी मध्यस्थी करून हे अतिरिक्त बांधकाम राजीव कुमार सिंग हे स्वतः  तोडतील हे ठरलं.  


पालिकेचे पथक दुसऱ्या दिवशी ही बांधकाम तोडायला  तेथे गेलं.  मात्र येथे कारवाई दरम्यान धक्काबुक्की झाली. त्यात एक महिला बेशुद्ध झाल्याने पथक  पुन्हा माघारी गेलं. मात्र तिसऱ्या दिवशी पथक तेथे तोडक कारवाई करण्यास गेल्यावर तेथिल महिलांनी गीता जैन यांना फोन केला. मात्र तोपर्यंत पालिकेच्या पथकाबरोबर महिलांना आणि पालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली. तेवढ्यात गीता जैन यांनी कनिष्ठ अभियंता शुभंम पाटील आणि संजय सोनी यांना तोडक कारवाई का केली, घरच्यांना नोटीस पाठवली होती का? असा सवाल केला. 1 जून नंतर तोडक कारवाई करू नये असे शासनाचे आदेश असताना कारवाई का केली? महिला आणि लहान मुलांना मारहाण धक्काबुक्की का केली? या बाबत प्रश्नाची सरबती सुरू केली. याचवेळी  अभियंता शुभम पाटील याला तुला हसायला का येतं, एका महिलेचं घर तुटतंय आणि तू हसतोस असं बोलून, जैन यांनी शुभम पाटीलचा शर्ट खेचून त्याच्या कानशिलात लगावली. 


यावर गीता जैन यांनी आपण अभियंताला कानशिलात मारल्याचं कबुल केलं. पण कुणी महिलांचा अपमान करणार तर मी त्याला मारणारच अशी भूमिका घेतली. अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या नावाखाली धमकी देवून वसुली सत्र चालू आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचंही म्हटलं आहे. तर गीता जैन यांनी महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकाकच्या आदेशाने हवाला देत पावसाळ्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याचे स्पष्ट आदेश असताना दोघे अभियंता तोडक कारवाईसाठी का गेले, महिला आणि लहान मुले तसेच वृद्धांना भर पावसात धक्काबुक्की करून घराबाहेर काढले असा आरोप त्यांनी केला. तसेच काशिमीरा पोलिसांतही गीता जैन यांनी तक्रार करून, दोघां अभियंतावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 


शुभम पाटील आणि संजय सोनी यांनी ऑन ड्युटी असताना गीता जैन यांनी धक्का बुक्की  करून कानशिलात मारली म्हणून काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काशिमीरा पोलिसांनी गीता जैन यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात  मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यास जैन यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.


ही बातमी वाचा: