Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.  ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने  जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने जामीन देण्यात येऊ शकतं नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. तर रबाळे पोलिस स्टेशन अंतर्गत अॅट्रोसिटीप्रकरणी जामिनाबाबत अद्याप पोलिसांचा जवाब येणे बाकी आहे.  त्यामुळे केतकीचा जेलमधीला मुक्काम वाढला आहे. 


केतकी चितळेविरोधात वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. 


दरम्यान, शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात केतकी चितळेच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. केतकी चितळेने मोबाईलमधील SMS डिलीट केले असल्याची माहिती समोर आली आहे. पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  केतकी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि SMS च्या माध्यमातून सक्रिय असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालं आहे. 


केतकीवर आतापर्यंत कुठे गुन्हे दाखल? 


केतकी चितळेविरोधात कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, बीडमधील आंबेजोगई, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंडवड येथे देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या :


Ketaki Chitale Case : केतकी चितळेच्या अडचणी वाढणार, मोबाईलमधील SMS डीलीट


Ketaki Chitale : केतकी चितळेवर अंबाजोगाईतही गुन्हा दाखल; आत्तापर्यंत कुठे गुन्हे दाखल?