Ketaki Chitale : आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने आता मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अभिनेत्रीने ठाणे पोलिसांकडून झालेली आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिला 15 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
ठाणे पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा दावा करत, अभिनेत्री केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे.
केतकीला झालेली शिक्षा अवास्तव! : महेश जेठमलानी
जेष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी देखील या प्रकरणी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘महाविकास आघाडी हे सर्वात गर्विष्ठ आणि क्रूर शासन आहे. केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर टिप्पणी करताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असल्या, तरी तिला झालेली ही शिक्षा अवास्तव आणि पूर्णपणे चुकीची आहे. परंतु, हे एकच प्रकरण नाही तर, महाविकास आघाडीकडून वैयक्तिक कारणास्तव जेल, छळ आणि हिंसाचारा झाल्याची अनेक प्रकरणे आहेत.’
तिच्या बाजूने कुणीच नाही! : आनंद रंगनाथन
केतकी प्रकरणात सगळ्यांनीच चुप्पी साधल्याने आनंद रंगनाथन यांनी देखील टीका करणारे एक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘ही केतकी चितळे. तिने शरद पवार यांची खिल्ली उडवली. तिला अटक करण्यात आली. तिला तुरुंगात जाऊन आज तीस दिवस झाले. या तीस दिवसांत तिच्या बाजूने कोणीही चकार शब्द काढलेला नाही. एखाद्या स्त्रीवादीने तर नाहीच..पण, ना लोकशाही टॅब्युलेटरने... ना मानवाधिकार कार्यकर्त्यांनी... कुणीही तिच्या बाजूने बोलले नाही. केतकी चितळे एपिलीप्सी या आजाराने ग्रस्त आहे. तिचे वजन देखील खुप्प कमी झाल्याचे कळते आहे. या अशा तुरुंगवासाच्या जाचात ती फार काळ राहू शकणार नाही.’ यासोबतच त्यांनी जेष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने त्यांचे आभार मानले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनंच केली आहे, असे म्हणत कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल केला गेला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, ती सध्या कारागृहात आहे. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीनं आता उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीनं आपल्या याचिकेतून केला असून याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
कोणाचेही मूलभूत अधिकार अमर्याद नाही, शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला दिलासा देण्यास कोर्टाचा नकार
Ketaki Chitale : केतकी चितळेचा तुरूंगातील मुक्काम वाढला, ठाणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; 16 जूनला होणार पुढील सुनावणी