Deepesh More: मुंबई (Mumbai) - गोवा (Goa) महामार्गावर पनवेल जवळील चिंचवण गावाजवळ दीपेश मोरे (Deepesh More) यांचा मोठा अपघात झाला. या अपघातात दीपेश मोरे यांचा मृत्यू झाला आहे. दीपेश मोरे हे ठाणे (Thane) येथील सुप्रसिद्ध निवेदक आहेत. ते आपल्या सहकाऱ्यांसह महाड (Mahad) येथे गेले होते. आज सकाळी त्यांच्या गाडीचा चिंचवण गावाच्या हद्दीत अपघात झाला. शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने रस्त्यावर उभी होती. या गाडीला दीपेश यांची गाडी धडकली.
श्रीकांत शिंदे यांनी शेअर केलं ट्वीट
खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Eknath Shinde) यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन दीपेश मोरे (Deepesh More) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "परिणिताज इव्हेंटचे प्रमुख, ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज मुंबई-गोवा महामार्गावर चिंचवणजवळ भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले.ही बातमी अतिशय धक्कादायक असून मनाला चटका लावून जाणारी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो ही प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली" श्रीकांत शिंदे यांच्या ट्वीटला कमेंट करत अनेकांनी दीपेश यांना श्रद्धांजली वाहिली.
दीपेश यांच्या गाडीनं शिवशाही बसला पाठीमागून धडक दिली. या धडकेत गाडीमधील दीपेश मोरे यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या सहकारी रश्मी खावणेकर या जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा जाधव आणि कोमल माने या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद पोलिसांनी केली आली असून अधिक तपास पनवेल पोलीस करत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra News Updates 9th March 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...