ठाणे : जीवरक्षक (Lifeguard) राजेश खारकर (Rajesh Kharkar) यांचं दुःखद निधन (Passes Away) झालं आहे. त्यांनी विटावा खाडीत बुडणाऱ्या 3000 हून अधिक जणांचा जीव वाचवला आहे. गेल्या पंचवीस वर्षात विटावा खाडीत (Vitawa Khadi, Thane) बुडणाऱ्या 3000 हून जास्त जीव वाचवणारे जीवरक्षक राजेश खारकर यांचं निधन झालं (Lifeguard Rajesh Kharkar Passed Away) आहे. राजेश खारकर यांचं रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं असा मोठा परिवार आहे.
जीवरक्षक राजेश खारकरांचं निधन
एका दैवी देणगीचा साक्षीदार असलेले राजेश विटावा खाडीच्या पैलतीरावर विटावा कोळीवाड्यात खाडीच्या किनाऱ्यावर राहायचे. विटावा खाडीच्या परिसरात एक वातावरणाचा विचित्र असा भूगर्भीय दाब आहे. यामध्ये गेल्या अनेक वर्षात हजारो लोक पडून खाडीत बुडून मेले आहेत. रेल्वेमधून खाडीत पडलेल्याचा आवाज एखाद्या दैवी देणगी सारखा त्यांना अचूक यायचा. धो-धो पावसातही त्यांना खाडीत पडलेल्याचा आवाज स्पष्ट ऐकू यायचा आणि कशाचीही तमा न बाळगता रात्री-बेरात्री पुराच्या पाण्यातही ते बेभानपणे खाडीत उडी मारून बुडणारा जीव वाचवायचे.
विटावा खाडीत बुडणाऱ्या 3000 हून अधिक जणांना दिलं जीवदान
अनेक जणांचा जीव वाचवलेल्या राजेशला वाचवण्यात मात्र नातेवाईकांना अपयश आलं. त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने परिसरात, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.