कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan) भर रस्त्यात बीएमडब्लू (BMW) कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी (Police) अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून अटक करण्यात आलेला शुभम मितालिया (Shubham Mitaliya) हा तरुण स्टंट करीत होता. ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. ही कार त्या अल्पवयीन मुलाची आहे. पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया (Shubham Mitaliya) आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात अल्पवयीन कारचालकाचा प्रताप समोर आला आहे. त्या पाठोपाठ ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरातील प्रकार 


अधिकची माहिती अशी की, सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरुन आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक बीएमडब्लू कार येताना दिसली. या कारला पाहताच रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचारी आणि अन्य वाहन चालकांना धक्का बसला. ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. मात्र त्या कारच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरुन मस्तवालपणे बसला होता. तो या कारच्या राईडचा आनंद घेत होता. भर रस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर तरुण पाय पसरुन बसला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहताच बाजारपेठ पोलिसांनी (Police) या प्रकरणाची गंभीर दखल घेत या स्टंटबाज तरुणाचा शोध सुरु केला. 


तरुण बोनेटवर बसला आणि कारचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती 


व्हिडिओमध्ये आढळून येणारी कार आणि स्टंटबाज मुलगा पाहून पोलिसांनी या कारचा नंबर तपासला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेतले. कारवर बसून स्टंट करणारा तरुण शुभम मितालिया होता.  मात्र तो बोनेटवर बसला आणि कारचे स्टिअरिंग त्याने अल्पवयीन मुलाच्या हाती दिले होते. कार चालविणारा मुलगा अल्पवयीन आहे. शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो. तर कार चालविणारा अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्वेत राहतो. ही कार अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्याला घेऊन दिली आहे. या दोघांना ताब्यात घेतले. शुभम मितालियासह अल्पवयीन कार चालकाच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात अल्पवयीन मुलाच्या पोर्शे कारने दोघांचा जीव घेतल्यानंतर पोलीस यंत्रणा अशा प्रकारांवर नजर ठेऊन आहे. त्यामुळे कल्याणमधील या प्रकरानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Indigo Flight : भांग पिऊन इमर्जन्सी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न, संपूर्ण विमान प्रवासात प्रवाशाचा दंगा, पोलिसांनी दाखवला इंगा