Kalyan-Dombivli Municipal Corporation : केडीएमसीच्या (KDMC) अग्निशमन दलात (Fire department) 15 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या होत्या. याच काळात अग्निशमन दलात (Fire department) 15 महिला कर्मचार्यांची आणि 45 पुरुष कर्मचार्याची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे अग्निशमनच्या (Fire department) जुन्या कर्मचार्याचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.  
 
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन (Kalyan-Dombivli Municipal Corporation) दलात अनेक वर्षापासून असलेल्या अपुऱ्या कर्मचार्याची कमतरता दूर झाली आहे. पालिका प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने 60 कर्मचार्याची भरती केली आहे. विशेष म्हणजे या 60 कर्मचार्यांमध्ये 15 महिला कर्मचार्यांचा समावेश आहे. या महिला कर्मचार्यांनी आपले प्रशिक्षण काही वर्षापूर्वीच पूर्ण केलेले आहे. त्यांना प्रत्यक्ष सेवेत दाखल होत सेवा करण्याची प्रतीक्षा होती, अखेर पालिका प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करत या महिलांना अग्निशमन सेवेत हजर करून घेतले आहे.


मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या होत्या. याच काळात अग्निशमन दलात 15 महिला कर्मचार्याची आणि 45 पुरुष कर्मचार्याची भरती करण्यात आल्याने अग्निशमनच्या जुन्या कर्मचार्याचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. शहरात इमारती कोसळण्याच्या, कंपन्यांना किंवा घरात आगी लागण्याच्या, झाडे पडण्याच्या, पक्षी अडकल्याच्या कॉलवर पुरुष कर्मचार्या बरोबर या महिला कर्मचार्यांना देखील ड्युटी करावी लागणार आहे.  या महिला कर्मचार्यांनी या सर्व प्रकारातील प्रशिक्षण घेतल्याने अग्निशमन सेवेत काम करण्यासाठी त्या तयार आहेत. मुंबई महापालिकेने अग्निशमन सेवेत महिला कर्मचार्यांना सामावून घेतलेले असले, तरी ठाणे जिल्ह्यात अग्निशमन सेवेत महिलांना सामावून घेणारी कल्याण डोंबिवली हि पहिला महापालिका ठरली आहे.