कल्याण - डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा (Kalyan Dombivli Water Supply) आज बंद राहणार आहे. कल्याण, डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली, बारावे, नेतिवली, टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्तीचं काम आज करण्यात येणार आहे. या कामामुळे कल्याण, डोंबिवली, ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत बंद राहणार आहे.
सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मोहिली, बारावे, नेतिवली, टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांच्या विद्युत, यांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसंच उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.य त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय.
एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन
कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, टिटवाळा, वडवली भागाचा पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागाला पाणीपुरवठा केला जातो. मंगळवारी दुरुस्तीच्या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व भागाचा पाणीपुरवठा आज बंद
कल्याण डोंबिवली शहरांना दररोज सुमारे 350 हून अधिक दशलक्ष लीटर पाणीपुरवठा विविध स्रोतांमधून केला जातो. डोंबिवली शहराला नेतिवली टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. तर टिटवाळा, कल्याणसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या स्रोतांमधून मोहने, आंबिवली, वडवली परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या सर्व भागाचा पाणीपुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पाणी कपातीच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीकर नागरिकांची गैरसोय होणार आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
Pandharpur News: दुष्काळाची दाहकता यंदा जास्त जाणवणार; आजपासून पंढरपुरात पाणीकपातीला सुरुवात