कल्याण - डोंबिवली :  डोंबिवलीमध्ये (Dombivali) भर दिवसा महिलेवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. तर या चोरट्याने महिलेचं मंगळसूत्र देखील चोरल्याचं समोर आलंय. दरम्यान या प्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल करुन घेत आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे. तर या घटनेमुळे महिलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अशा लोकांवर जरब बसवण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती पावलं उचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


पोलिसांकडून सध्या आरोपीची शोध घेणं सुरु आहे. तर पुढील तपास देखील करण्यात येतोय. त्यामुळे हा आरोपी सापडणार का की आणखी एखाद्या महिलेवर पुन्हा असाच प्रसंग ओढावणार हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन सध्या कल्याण डोंबिवली प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 


नेमकं काय घडलं ?


कल्याण पूर्वेच्या होम बाबा टेकडीवर हा संपूर्ण प्रकार घडलाय. पीडित महिला या टेकडीवर असलेल्या देवस्थानाच्या ठिकाणी दर्शनासाठी जात होती. त्याचवेळी एका अज्ञाताने पीडितेला अडवत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या महिलेने त्याला विरोध केल्याने पुढचा अनर्थ टळला. मात्र या आरोपीने संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर तो तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 


लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची हत्या


कल्याणच्या विजयनगर परिसरामध्ये विजय जाधव आणि रसिका कोळंबेकर हे दोघं मागील काही महिन्यांपासून लिव इन रिलेशनशिपध्ये राहत होते. काही महिन्यांपासून विजय हा रसिकाच्या चारित्र्यावर  संशय घेत होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये सातत्याने वाद होते होते. रविवार सकाळच्या सुमारास विजय आणि रसिकामध्ये पुन्हा कोणत्यातरी कारणावरुन वाद झाले. त्यामुळे संतापलेल्या विजयने चाकूने रसिका वर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये रसिका गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी विजय याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रसिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


दरम्यान ही दोन्ही प्रकरणं कल्याण डोंबिवलीमध्ये घडली असल्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर आता यावर पोलीसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


हेही वाचा : 


Palghar News : मित्रानेचं संपवलं मैत्रीणीचं आयुष्य, आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या हत्येमुळे पालघर हादरलं