Eknath Shinde on Dombivli MIDC Blast : डोंबिवलीस्थित एमआयडीसीत स्फोट आज (दि.23) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोट कशामुळे झालाय याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एमआयडीसी परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. सर्वत्र आगडोंग पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरातील अनेक इमारतींच्या काचा देखील फुटल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डोंबिवली स्फोटाबाबत भाष्य केलं आहे. 


डोंबिवली एमआयडीसीमध्ये अमुदान नावाची एक कंपनी आहे, त्यामध्ये बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. डोंबिवलीतील घटनास्थळ बचावपथक दाखल झालेले आहे. जिल्हाधिकारी आणि खासदार त्याठिकाणी पोहोचले आहेत. घटनास्थळावरिल परिस्थिती नियंत्रणात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. 


अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत


डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 


मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले ?


मला या घटनेबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. मी अग्निशामक गाड्या त्याठिकाणी पाठवण्यास सांगितल्या आहेत. जेणेकरुन आपल्या आग आटोक्यात आणता येईल. त्यामुळे सर्व यंत्रणा आपण अलर्ट मोडवर ठेवलेली आहे. शिवाय जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावे, यासाठी देखील आपण रुग्णालयात सूचना दिल्या आहेत. नेमकं या आगीचे कारण काय आहे हे शोधण्याचे काम आम्ही नंतर करणार आहोत. त्यापूर्वी जखमींना उपचार मिळण्याचे आणि आग आटोक्यात आणणे महत्वाचे आहे, असं ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत. 


उदय सामंत काय म्हणाले ?


मी स्वत: 15 ते 20 मिनीटांमध्ये घटनास्थळी पोहोचत आहे. जिल्ह्यधिकाऱ्यांशी मी माहिती घेतली. ओमेगा नावाच्या कंपनीत हा स्फोट झालेला आहे. जखमींच्या जीवाला धोक पोहोचू नये, हे आमचे प्राधान्य आहे. मी त्याठिकाणी पोहोचून स्वत: माहिती घेणार आहे. सध्या आग विझवणे, हेच प्रायोरिटीचे काम आहे. खासदार श्रीकांत शिंदे देखील तिथे पोहोचत आहेत, असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, धुराचे प्रचंड लोट, इमारतींच्या काचा फुटल्या