CM Eknath Shinde: ठाणे शहरातील (Thane city) वाहतूक कोंडीमुळे (thane traffic) बाराही महिने त्रस्त झालेल्या ठाणेकरांना आता दिलासा मिळणे शक्यता आहे. ठाणेकरांनी (thane) केलेल्या मागणीचा विचार करून ठाणेकर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीन नवीन खाडी पूलांना मान्यता दिली आहे. ठाणे आणि भिवंडी ही दोन शहरे जोडण्यासाठी या खाडी पूलांची निर्मिती करण्यात येईल. नवीन खाडी पुलामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
ठाणेकरांच्या हाकेला अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. एम एम आर डी ए च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात तब्बल दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांसाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यात वागळे इस्टेट येथे एक उड्डाणपूल, शिळफाटा ते मानकोली रस्ता बांधणी, कल्याण आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खाडी पुलाचे रुंदीकरण, अशा अनेक प्रकल्पांचा समावेश त्यात आहे. मात्र महत्त्वाचे म्हणजे ठाणे आणि भिवंडी या दोन शहरांना जोडण्यासाठी वसईच्या खाडीवर तीन खाडी पूलांची निर्मिती एमएमआरडीए करणार आहे. गायमुख ते पाये गाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर या मार्गाचा समावेश आहे. या तीनही पुलांसाठी एकत्रितपणे एक हजार 162 कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला ठाणे ते भिवंडी हा प्रवास करण्यासाठी आग्रा महामार्गाद्वारे कशेळी, काल्हेर आणि अंजूर फाटा असा प्रवास करावा लागतो. यावरून मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. त्यामुळे हे नवे पूल वाहतुकीसाठी वेळेची आणि इंधनाची बचत करणारे ठरतील. कसे असतील हे खाडी पुल याचा आढावा घेतला आहे.
या तीन पुलांसह अन्य प्रकल्प वागळे इस्टेट भागातील स.गो. बर्वे मार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच असून येथे उड्डाणपूल उभारणीसाठी 98 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिळफाटा ते माणकोली या मार्गासाठी 614 कोटींची निविदा. गांधारी पुलाच्या रुंदीकरणासाठी 148 कोटी 62 लाखांची निविदा काढण्यात आली आहे. वसई ते पालघर जोडण्यासाठी नारिंगी खाडी येथे मार्बल पाडा जेट्टी ते दातिवरे जेट्टी आणि पालघर ते वैतरणा नदीवर पूल उभारणीसाठी 741 कोटींची निविदा काढण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या