भिवंडी : भिवंडीत (Bhiwandi) भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray Group) पक्षात प्रवेश केल्या नंतर रविवारी सायंकाळी भिवंडी ग्रामीण मध्ये उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडों कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. भिवंडीत ठाकरे गटात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होता. यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपवर सडकून टीका देखील केल्याचं पाहायला मिळालं. भाजपने  अचारसंहिता भंग केली तरी त्यावर निवडणूक आयोगाने सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. 


पण काँग्रेसने त्यांना रोखलं - सुषमा अंधारे


भाजपने महाराष्ट्रात जाणीवपूर्वक बीआरएसला  चुचकारत खतपाणी घातलं. पण त्यांना  काँग्रेसने रोखले या बद्दल काँग्रेसचे अभिनंदन सुषमा अंधारे यांनी केलंय. चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाचे वाईट नाही वाटले, महाविकास आघाडीतील काँग्रेस ने चांगली लढत दिली आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. राज्यांमध्ये ऐन निवडणुकीच्या काळामध्ये लाडली बहन योजना जाहीर करून आचारसंहिता सुरू असताना पैसे वाटले हा आचारसंहितेचा भंग आहे पण त्याकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष सोयीस्कर केले, असा गंभीर आरोप देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी केलाय. 


भाजपची आरक्षण देण्याची नियत असेल तर... - सुषमा अंधारे 


भाजपने मराठा आणि ओबीसी  समाजाला आपापसात झुंजवत कलगीतुरा करत आहे.एका नेत्याने छत्रपती यांची शपथ घेऊन मी मराठा आरक्षण देणार असे सांगायचं तर एकाने ओबीसींच्या सोबत आहे असे सांगायचे नक्की तुम्ही कोणाच्या सोबत आहात हे कळत नाही. आरक्षणासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य कडून केंद्राकडे गेले आहेत .भाजपाचे आरक्षण देण्याची खरी नियत असेल तर त्यांनी विधानसभेत कायदा करून केंद्राकडे पाठवावा केंद्राने विशेष अधिवेशन घ्यावे भाजपाने जतिजाती यांना आपापसात झुंजवू नये, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. 


सरसकट कर्ज माफी देणं गरजेचं - सुषमा अंधारे


एकीकडे दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी यामुळे शेतकरी त्रस्त असताना सरकारला त्याकडे बघण्यासाठी वेळ नाही. तृणधान्य वर्ष साजरे करताना ज्वारीचा  समावेश तृणधान्य होत असताना नुकसानीची शासकीय पोर्टल वर माहिती भरताना त्यामध्ये ज्वारीचा रकाना नाही. सरसकट कर्ज माफी देणे गरजेचे आहे.पीक विम्याची जाहिरात केली जाते पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. शेतीसाठी चुकीचे आयात धोरण यामुळे शेतकरी त्रस्त आहे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधेरे यांनी दिली आहे.


हेही वाचा :


Uddhav Thackeray : काँग्रेस हरली त्याचं दु:ख आहेच, पण हे 2024 चे शुभसंकेत; निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात