मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी राजकीय बैठकांचा जोर लावला असून मनसेनेही त्यामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र आहे. पहिल्या सत्रात मुंबई, ठाणे आणि पुणे या विभागांच्या आढावा घेतला घेण्यात आला असून ठाण्यातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवारही कोण असावा यावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेवारी देण्यात यावी असा अहवाल प्राप्त झाला आहे. 


मनसेच्या आजच्या बैठकीच्या पहिल्या सत्रात मुंबईतील 36, ठाणे, पालघरमधील 24, पुणे शहरातील 11 आणि पुणे ग्रामीण परिसरातील 8 मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. दुसऱ्या सतरात इतर जागाविषयी अहवाल आणि आढावा घेतला जातोय. 


मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाचपाखाडी मतदारसंघातून मनसे नेते अभिजीत पानसे यांचे नाव पुढे करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः प्रत्येक मतदारसंघाचा अहवाल घेत असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे.


मनसेकडे इच्छुकांची रांग


मनसे बैठकीत आज 225 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी आणि निरीक्षकांनी अहवाल  सादर केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेमधून लढण्यासाठी अनेक पदाधिकारी, नेते इच्छुक आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक मतदारसंघात मनसेमधून लढण्यासाठी पदाधिकारी आणि नेत्यामध्ये चुरस असल्याचं चित्र आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेतेमंडळींकडे पदाधिकारी आणि निरीक्षक राज्यातील विधानसभा मतदारसंघाचा अहवाल सादर करत आहेत. उमेदवारीबाबत आलेला अहवाल आणि गुणवत्ता पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी काळात विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी घोषित करतील अशी माहिती आहे. 


मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसे नेते पदाधिकारी राज्यभर कामाला लागल्याचं चित्र आहे. 


राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार


राज ठाकरे आगामी काळात पुढील दौऱ्याविषयी निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा दौरा केला होता. यानंतर आता महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये आणि विदर्भातील काही भागात राज ठाकरे पुन्हा आगामी काळामध्ये दौरा करणार आहेत.


ही बातमी वाचा: