ठाणे : मला माझ्या महाराष्ट्रातील जनतेला उत्तर द्यायचे आहे, म्हणून आज इथे आलोय, दिघा रेल्वे स्थानकाची (Digha Railway Station) पाहणी करण्यासाठी आले असता आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) प्रतिक्रिया दिली. मागील अनेक महिन्यांपासून दिघा रेल्वे स्थानाकाची सगळेजण वाट पाहताोय. ट्रेन कधी सुरु होणार असा प्रश्न जसा पडलाय, तसाच अच्छे दिन कधी येणार असा देखील प्रश्न पडलाय, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जर 15 जानेवारीपर्यंत सुरु केला नाही तर आम्ही जाऊ असा इशारा देखील आदित्य ठाकरेंनी दिलाय. सरकारला जर अन्याय करायचा असेल तर महाराष्ट्र एकमेव राज्य असा काही कलम आहे का असा बोचरा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. पण महाराष्ट्रावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
9 महिन्यांपासून दिघा रेल्वे स्थानक तयार - आदित्य ठाकरे
दिघा रेल्वेस्थानक 9 महिन्यांपासून तयार झाले आहे. इथे लाईट सुरु आहे, स्वच्छता देखील केली जातेय पण यासाठी पैसे कोण भरतंय तर आपण. रेल्वे मंत्र्यांना मी विनंती करतो हवं तर सेल्फी काढून पाठवतो, हे रेल्वे स्थानक लवकरात लवकर सुरु करा.
यांची निवडणूक घेण्याची हिंमत नाही - आदित्य ठाकरे
देशात सध्या एक देश एक निवडणूक या संदर्भात विचारमंथन सुरु आहे. त्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटलं, आता देशात वन नेशन वन पोल सूचना जारी झाली आहे. यांची निवडणुका घेण्याची हिंमत नाही म्हणून हे एकच निवडणूक घेणार. पण यामध्ये महाराष्ट्र पण आहे आणि आम्ही महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
मोठं काही करु नका, आदित्य ठाकरेंचा टोला
मोठे काही करू नका नाही तर पोलिसांवर प्रेशर येईल . बईत असाच एक ब्रीज आहे त्याला मी delay ब्रीज नाव दिलं आणि त्याचं उद्घाटन केलं. शेवटी तेच झालं आणि आमच्यावर केस झाली. पण इथे तसं काही करता येत नाही कारण आपल्याला ट्रेन चालवता येत नाही आणि यांना सरकार चालवता येत नाही, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला.