मुंबई : 2017 या वर्षात बऱ्याच मोठ्या आर्थिक घडामोडी घडल्या. या वर्षी कार बाजारातही अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. यंदा भारतात अनेक नव्या कार लाँच झाल्या. पण त्याचबरोबर अनेक चर्चेत असलेल्या कारचं उत्पादनही काही कंपन्यांनी बंद केलं. यंदा भारतात चर्चेत असलेल्या तब्बल सात कार बंद करण्यात आल्या.
ह्युंदाई सेंटा-फे
ह्युंदाईनं सेंटा फे ही कार 2010 साली लाँच केली होती. 2014 साली या कारचं अपडेटेड व्हर्जनंही लाँच करण्यात आलं होतं. या कारची किंमत तब्बल 31.07 लाख एवढी होती. पण या कारला नंतर कमी प्रतिसाद मिळत असल्यानं यंदा ही कार बंद करण्याचा निर्णय ह्युंदाईनं घेतला.
बीएमडब्ल्यू 1-सीरीज
बीएमडब्ल्यू 1-सीरीज ही कार भारतीय बाजारात चार वर्ष होती. पण या कारची किंमत जास्त असल्यानं तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जानेवारी 2017 मध्ये या कारचं उत्पादन थांबवण्यात आलं.
स्कोडा येती
तब्बल सात वर्ष भारतीय बाजारात असलेल्या स्कोडा येती ही कार मे 2017 मध्ये बंद करण्यात आली. छोटी साईज आणि जास्त किंमत यामुळे या कारला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.
मारुती सुझुकी रिट्झ
2009 साली लाँच करण्यात आलेली रिट्झ ही कार या वर्षी बंद करण्याचा निर्णय घेतला. सुझुकीनं या या कारचे तब्बल 4 लाख युनिटची आतापर्यंत विक्री केली होती. पण सुझुकी काही नवे मॉडेल बाजारात आणणार असल्यानं त्यांनी रिट्झ कार बंद करण्याचा निर्णय घेतला.
ह्युंदाई आय 10
2007 साली ह्युंदाई आय 10 भारतात लाँच करण्यात आली होती. ही कार बरीच चर्चेतही होती. पण 2013 साली कंपनीनं ग्रँण्ड आय 10 लाँच केली. ज्यानंतर आय 10च्या विक्रीत घट झाली. त्यामुळे यावर्षी कंपनीनं आय 10ची विक्री बंद केली.
टाटा सफारी डायकोर
टाटा सफारी डायकोर भारतीय बाजारात तब्बल 19 वर्ष होती. 1998 साली लाँछ करण्यात आलेल्या या कारचं नवं व्हर्जन 2012 साली सफारी स्ट्रॉर्म या नावानं लाँच करण्यात आलं. स्ट्रॉर्मची विक्री वाढवण्यासाठी डायकोरच उत्पादन बंद करण्याचा निर्णय टाटानं घेतला.
होंडा मोबिलियो
होंडानं 7 सीटर मोबिलियो ही कार 2014 साली लाँच केली होते. सुरुवातीला या कारला मागणीही चांगली होती. पण नंतर काही कारणास्तव कंपनीनं ही कार बंद करण्याचा निर्णय घेतला. मार्च 2017 पासून या कारचं उत्पादन बंद करण्यात आलं होतं.
Year ender 2017: 2017 साली 'या' सात कार बंद झाल्या!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Dec 2017 10:41 PM (IST)
या वर्षी कार बाजारातही अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. यंदा भारतात अनेक नव्या कार लाँच झाल्या. पण त्याचबरोबर अनेक चर्चेत असलेल्या कारचं उत्पादनही काही कंपन्यांनी बंद केलं. यंदा भारतात चर्चेत असलेल्या तब्बल सात कार बंद करण्यात आल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -