मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात खास व्हावी यासाठी स्मार्टफोन कंपन्यांनी देखील काही नवनव्या ऑफर्स आणल्या आहेत. अशावेळी मोबाइल कंपनी विवोनं देखील एक नवी ऑफर लाँच केली आहे.


विवोनं आपला स्मार्टफोन विवो V7च्या तब्बल 2000 रुपयांची सूट दिली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आता फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरुन 16,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच लाँच झालेल्या या स्मार्टफोनची किंमत 18,990 रुपये होती. उत्कृष्ट कॅमेरा आणि स्पीकर अशी विवोच्या स्मार्टफोनची ओळख आहे.

विवो V7 स्मार्टफोनचे खास फीचर्स

विवो V7मध्ये 5.7 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच याचं रेझ्युलेशन 1440x720 पिक्सल आहे. यामध्ये 1.8Ghz स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 4 जीबी रॅमही देण्यात आली आहे. यामध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी असून ती एसडी कार्डनं वाढवताही येऊ शकते.

विवोच्या या फोनची खासियत म्हणजे याचा कॅमेरा. या फोनमध्ये तब्बल 24 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तसेच यामध्ये विवो फेस फीचरही आहे. ज्यामध्ये तुम्ही आपल्या चेहऱ्यानं स्मार्टफोन अनलॉक करु शकतात.

या स्मार्टफोनची बॅटरी 3000 mAh आहे. तसेच याच्या रिअर बॉडीवर फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.