Yamaha Aerox 155 Vs Aprilia SXR 160 : स्कूटर्स या केवळ प्रवासासाठी नसून मजा आणि शैलीसाठी देखील त्याचा वापर केला जातो. जसे की, या दोन कमाल-स्कूटर्सने दाखवले आहे. या प्रीमियम, फीचर पॅक्ड आणि चांगल्या कामगिरीसह स्टायलिश स्कूटर्स आहेत. ज्यांना जास्त कार्यक्षमतेसह अधिक सोय हवी आहे त्यांच्यासाठी या चांगल्या स्कूटर्स आहेत. जाणून घ्या या स्कूटर्सचे फीचर्स आणि बरंच काही..


लूक आणि फीचर्स :
यामाहा एरोक्स (Yamaha Aerox)155 लांबीची आहे.  पण,  Aprilia SXR 160 रुंद आहे. तर Aprilia ला ग्राऊंड क्लिअरन्स जास्त आहे. एरोक्स मोटारसायकल सारखी दिसणारी स्कूटर आहे. या स्कूटरला मागील बाजूने स्पोर्टियर लूक आहे. एप्रिलिया जास्त प्रीमियम आहे आणि अधिक 'मॅक्सी-स्कूटर' लूकसह उपलब्ध आहे. या स्कूटरची सीट मोठी आहे. फीचर्सच्या बाबतीत, दोन्ही तुम्हाला त्यांच्या प्रीमियम किंमत-टॅगसाठी चांगले फीचर्स देतात. यामध्ये एलईडी हेडलॅम्प, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह आधुनिक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहेत. तर, Yamaha Aerox 155 मध्ये काही अतिरिक्त फीचर्स आहेत आणि ती स्टार्ट/स्टॉप सिस्टीम, अगदी कीलेस एंट्री सारख्या फीचर्ससह येते. Yamaha Aerox मध्ये 25 लीटर स्टोरेज आहे तर Aprilia मध्ये 21 लीटर स्टोरेज आहे.


इंजिन आणि पॉवर :
या दोन्ही स्कूटरमध्ये लहान इंजिन नाहीत. त्यामुळे या दोन्ही स्कूटर 160cc सेगमेंटमध्ये आहेत. ज्यामध्ये जलद गती किंवा अगदी क्रूझिंगसाठी योग्य शक्ती आहे. Aprilia 160cc मध्ये मोठे इंजिन असूनही, ते 10.9 PS पॉवर निर्माण करते जे Yamaha च्या 155.1cc इंजिनपेक्षा कमी आहे जे 14.9PS पॉवर जनरेट करते. यामाहामध्येही टॉर्क जास्त आहे. वास्तविक जगामध्ये कामगिरीच्या दृष्टीने, यामाहा एरोक्स 155 वेगवान आणि शक्तिशाली वाटते तर एप्रिलिया थोडी अधिक गुळगुळीत आणि चालण्यास आरामदायक आहे.


यामाहा स्पोर्टी आहे. दोघांचेही मायलेज चांगले आहे. पण, यामाहा येथे 40kmpl पेक्षा अधिक कार्यक्षम आहे. दोन्ही स्कूटर्सची किंमत एकमेकांच्या अगदी जवळ आहे जी एक्स-शोरूम रुपये 1.3 लाख आहे. एप्रिलियाची किंमत थोडीशी कमी आहे तसेच जास्त वॉरंटी आहे. शेवटी, यामाहा अधिक फीचर्स आणि फेसिलिटी देते तर एप्रिलिया थोडी जास्त आरामदायक आणि जास्त व्यावहारिक आहे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha