Redmi 10 Prime : मोबाईल फोन निर्मिती कंपनी Xiaomi आज आपला नवीन स्मार्टफोन Redmi 10 Prime भारतात लॉन्च करत आहे.  Redmi 10 Prime स्मार्टफोन 3 सप्टेंबर रोजी दुपारी लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरीसंदर्भात कंपनीनं आधी घोषणा केली होती.  Redmi च्या या फोनमध्ये तब्बल 6 हजार mAH ची बॅटरी ग्राहकांना दिली जाणार आहे.  


Best Smartphones : 15 हजारांहून कमी किमतीत 6 जीबी रॅम आणि 6000mAh दमदार बॅटरीचे स्मार्टफोन्स


शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, Redmi 10 Prime 6000mAh बॅटरीसह वजनाने हलका असलेला फोन आहे. अद्याप या मोबाईलच्या किमतीबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही.  या फोनमध्ये स्टॅंडर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट (fast charging support) रिव्हर्स फास्ट चार्जिंग (reverse fast charging) देखील दिलेलं आहे. फोनमध्ये फ्रंट पॅनलवर पातळ बॅजलसह पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे.


Apple iPhone 13 : आयफोन 13 सीरिज सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता, अनलॉकसाठी खास फीचर असणार 


Redmi 9 Prime (रेडमी 9 प्राइम) हिट झाल्यानंतर हा फोन मार्केट मध्ये आणला जात आहे. कंपनीला आशा आहे की, हा फोन मार्केटमध्ये खूप चालेल. REDMI 10 PRIME SPECIFICATION बद्दल सांगायचं झालं तर  रेडमी 10 प्राइमला नवीन डिझाईनमध्ये आणलं आहे. या फोनला फुल HD+ रेजोल्यूशनसह 6.5 इंच डिस्प्ले असेल. फोनला कोर्निंग गोरिला ग्लासचं प्रोटेक्शन दिलं आहे. 



REDMI 10 PRIME च्या CAMERA बद्दल सांगायचं झालं तर Redmi 10 Primeमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सोबतच एक 13 मेगापिक्सलची लेंस आणि एक अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस दिली जाणार आहे. हा फोन मीडियाटेक हीलियो G88 SoC द्वारे संचलित असेल. या फोनमध्ये  6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. अद्याप या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल मात्र कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.