Tech News : अमेरिकन जायंट टेक कंपनी अॅपल (Apple) पुढील महिन्यात आपली आयफोन 13 सीरिज लाँच करू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, ही नवीन सीरिज17 सप्टेंबरला लॉन्च केली जाऊ शकते. या सीरिजअंतर्गत कंपनी चार मॉडेल लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगले फिचर्स लाँच केले जातील. यामध्ये सर्वात खास फेस अनलॉक फीचर असेल. कंपनी असे फीचर आणत आहे, ज्यात मास्क किंवा चष्मा घालूनही फोन अनलॉक केला जाईल.


 2 इव्हेंटमध्ये प्रोडक्ट्स लाँच केले जातील


लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Apple या वर्षी दोन कार्यक्रम आयोजित करेल. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, तर दुसरा कार्यक्रम महिन्याच्या शेवटी आयोजित केला जाऊ शकतो. लॉन्च इव्हेंटमध्ये, कंपनी आपले AirPods आणि iPad लॉन्च करू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी या iPhone 13 सीरिजमध्ये iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 Mini लाँच करू शकते.


आयफोन 13 सीरिजचे स्मार्टफोन महाग? 


मिळालेल्या माहितीनुसार, आयफोनचा कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट खर्च वाढला आहे. यामुळे फोन देखील महाग होण्याची दाट शक्यता आहे.  त्यामुळे आयफोन प्रेमींना आयफोन 13 साठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. वास्तविक तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणजेच TSMC ही जगातील सर्वात मोठी चिप बनवणारी कंपनी आहे. तीच कंपनी अॅपलसाठी चिपसेट देखील बनवते. आगामी सीरिजमध्ये Apple A15 Bionic चिपसेट वापरण्यात येणार असल्याचे कंपनीने आधीच जाहीर केले आहे. टीएसएमसीने किमती 20 टक्क्यांनी वाढवल्या आहेत, ज्यामुळे स्पष्टपणे आयफोन 13 ची किंमत देखील जास्त असेल.


फास्ट 5G सपोर्ट मिळणार


लीक झालेल्या रिपोर्टनुसार, आयफोन 13 सीरिजला mmWave 5G साठी सपोर्ट मिळू शकतो. यावर्षी अनेक देशांत mmWave 5G कव्हरेज मिळणे सुरू होईल, जेणेकरून यूजर्स आयफोन 13 द्वारे हाय-स्पीड 5G कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतील. फास्ट इंटरनेट स्पीड इतर 5G नेटवर्कपेक्षा mmWave नेटवर्कवर उपलब्ध आहे. पण त्याची किंमत देखील जास्त आहे.


डिस्प्ले कसा असेल?


Apple चे iPhones iOS 15, A15 bionic वर काम करतील. यामध्ये, इमेज प्रोसेसिंगसाठी लिक्विड क्रिस्टल पॉलिमर सर्किट बोर्ड व्यतिरिक्त नाईट मोड कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्यांना नवीन क्वालकॉम एक्स 60 मॉडेल आणि वायफाय 6 ई सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो. त्यांच्यामध्ये 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.