सॅमसंग (Samsung) आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M23 5G लवकरच बाजारात आणत आहे. Galaxy M23 5G हा फोन या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते. याशिवाय यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. फोनच्या इतर फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy M23 5G हा स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. परफॉर्मन्स, मीडियाटेक हेलिओ जी 90 प्रोसेसर त्यात वापरला जाऊ शकतो. यामध्ये कंपनी 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देऊ शकते.
कॅमेरा
Samsung Galaxy M23 5G स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल. त्याचबरोबर 2-2 मेगापिक्सेल मायक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी त्यात 13 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.
पॉवर आणि कनेक्टिव्हिटी
Samsung Galaxy M23 5G फोनमध्ये पॉवरसाठी, 5000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी, त्यात वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
इतर बातम्या
- Samrtphones Tips : स्मार्टफोन वापरताना काय काळजी घ्याल; 'या' गोष्टी टाळल्याने फोन लवकर खराब होणार नाही
- मोटोरोलाचा 5G स्मार्टफोन Motorola Edge 20 भारतात लॉन्च, एकापेक्षा एक दमदार फिचर्स
- Best Camera Phones : 108 मेगापिक्सलचे टॉप 5 स्मार्टफोन्स, किंमत 20 हजारांहून कमी
- Samsung Galaxy Unpacked 2021 : आज सॅमसंगचा मेगा इव्हेंट, फोल्डेबल स्मार्टफोन्ससह अनेक गॅजेट्स लॉन्च होण्याची शक्यता