मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यादरम्यान गुगल आपल्या डुडलमार्फत 'कोरोना वॉरियर्स' म्हणजेच कोरोनाला हरवण्यासाठी लढा देणाऱ्यांना थँक्यू म्हणत आहेत. या व्यक्ती लॉकडाऊन असूनही सतत आपल्या सेवा देत आहेत. गुगलने यासाठी डूडलची खास सीरीज तयार केली आहे. या सीरिजच्या माध्यमातून ते कोरोना विरूद्ध लढा देणाऱ्या आणि लोकांच्या मदतीसाठी तप्तर असणाऱ्या लोकांचा सन्मान करत आहेत.
गुगलने आज पुन्हा एकदा खास Doodle तयार केलं आहे. आतापर्यंत गुगलने प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांचा सन्मानार्थ डूडल तयार केलं होतं. आज गुगल या सर्वांना एकत्र डुडल तयार करून धन्यवाद म्हणत आहे.
आपल्या या खास स्पेशल डुडलमार्फत गुगलने फूड वर्कर्स, पॅकिंग अॅन्ड शिपिंग वर्कर्स, पब्लिक ट्रान्सपोर्टर्स, ग्रोसरी वर्कर्स, टिचर्स, सफाई कर्मचारी यांना धन्यवाद म्हणत आहे. गुगलने G हे अल्फाबेट वापरलं आहे. त्यानंतर लेटर्सऐवजी कॅरेक्टर्स वापरले असून पुन्हा GLE हे अल्फाबेट्स लिहिले आहेत.
दरम्यान, गुगलने कोरोना व्हायरसबाबत एक खास डुडल तयार केलं आहे. याआधी गुगलने शिक्षक, फऊड सर्विस देणारे कर्मचारी, लोकांपर्यंत आवश्यक सेवा पोहोचवणारे पॅकेजिंग, शिपिंग आणि डिलीवरी वर्कर्सना धन्यवाद दिलं होतं. याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसचे आभार मानण्यासाठी वेगवेगळे डुडल तयार केले होते. त्याचबरोबर एका डुडलमार्फत जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टीप्सही दिल्या होत्या.
संबंधित बातम्या :
Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर
Apple ने लॉन्च केला स्वस्त iPhone SE, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर?
5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य
Google Doodle | गुगलचं 'कोरोना वॉरियर्स'साठी खास डुडल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Apr 2020 11:16 AM (IST)
कोरोना विरूद्धच्या लढ्यात लढणाऱ्या योद्ध्यांसाठी गुगलने खास डुडल तयार केलं आहे. या डुडलमार्फत कोरोना वॉरियर्सचा सन्मान करत त्यांना धन्यवाद दिलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -