नवी दिल्ली : युट्यूबने भारतीय यूजर्ससाठी नवीन फिचर लॉन्च केलं आहे. या फिचरमध्ये यूपीआय पेमेंट ऑप्शन देण्यात आला आहे. या नव्या फिचरच्या मदतीने आता युट्यूब युजर्स सुपरचॅट, मूव्ही रेंटल आणि इतर ट्रान्जॅक्शन अगदी सहज करू शकता. याआधी युजर्स क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून पेमेंट करत असत. परंतु, आता आपल्या बँक अकाऊंटच्या मदतीने ते यूपीआयने देखील पेमेंट करू शकतात. यूजर्स आता यूट्यूब प्रीमियम आणि यूट्यूब म्युझिक सब्सक्रिप्शनचं पेमेंटही या फिचरमधून करू शकतात.


युट्यूबने याबाबत माहिती दिली आहे की, सर्व यूपीआय अॅप्स आता नव्या युपीआय पेमेंट ऑप्शनचा वापर करू शकतात. हे एका महिन्यासाठी, तीन महिन्यांसाठी प्रीपेड सब्सक्रिप्शन घेऊ शकता. दरम्यान, युट्यूबने हे फिचर आपल्या अशा नव्या युजर्ससाठी दिलं आहे, जे युट्यूब प्रीमियमचा वापर करू शकतात. अशातच ज्या युजर्सना युट्यूब ओरिजिनल्स पाहायचं असेल त्यांना यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. युट्यूबने सध्या आपले काही ओरिजनल शो फ्रीमध्ये युजर्ससाठी दिलेले आहेत. याआधी ते फक्त प्रीमियम सब्सक्राइबर्ससाठी होतं.


युट्यूब आता टिकटॉक अॅपप्रमाणे शॉर्ट्सवर काम करत आहे. यामुळे आता युजर्स छोटे व्हिडीओ तयार करून अपलोड करू शकणार आहे. गुगलकडे मोठ्या प्रमाणावर लायसेन्स असलेलं म्युझिक आहे. ज्याचा क्रिएटर आपल्या कंटेन्टसाठी वापर करू शकणार आहेत.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर


Apple ने लॉन्च केला स्वस्त iPhone SE, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर?

5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य