मुंबई : कोरोना कालावधीत सर्वाधिक चर्चा झाली आणि होतेय ती म्हणजे वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करण्यासंदर्भात. मागील वर्षी मार्च महिन्यात पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हापासून देशातील लाखो लोक घरून काम करत आहेत. याचाच फायदा जगभर सायबर चोरटे घेत असून सायबर हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचा धक्कादायक अहवाल जी -20 देशाच्या आर्थिक नियमांचे समन्वय करणाऱ्या फायनान्शिल स्टॅबिलिटी बोर्डाने दिला आहे


कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. यामुळे देशातील अर्थव्यवस्थेची गती मंदावली पण त्याचबरोबर सायबर हल्ल्यांना चालना मिळाली. देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. परंतु, वर्क फ्रॉम होम ही पद्धत आणखी काही काळ राहणार आहे. त्यामुळे कंपन्यानी सायबर सुरक्षा अधिक कडक करणे गरजेचे आहे. 


'या' अटीवर जवळपास 60 टक्के कर्मचारी कमी पगारात काम करण्यास तयार : Survey


फेब्रुवारी 2020 मध्ये फिशिंग, मालवेअर, रॅन्समवेअर यांच्या हल्ल्याची संख्या जगभरात दर आठवड्याला सुमारे पाच हजार होती. परंतु, एप्रिल 2021 मध्ये ही संख्येत वाढ झाली असून  दर आठवड्याला दोन लाख इतकी झाली आहे. 


2008 सालच्या जागतिक आर्थिक संकटानंतर कोरोनाचा काळ हा अर्थव्यवस्थेसाठी अंत्यत कठीण होता. तरी या कठीण काळात देखील परिस्थीवर नियंत्रण मिळवण्यास काही प्रमाणात यश आल्याचे, एफएसबीने म्हटले आहे.


Work From Home नंतर ऑफिसमध्ये परतण्याऐवजी कर्मचारी नोकरी सोडत आहेत : सर्व्हे


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढचे काही महिने तरी अनेकांना घरूनच काम करावं लागणार आहे. तरी काही कंपन्यांनी कायमची संमिश्र कार्यप्रणाली स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर जोखीम व्यवस्थापन प्रक्रिया, सायबर हल्ल्याची नोंद ठेवणारी यंत्रणा याबरोबरच थर्ड पार्टी सेवा देणाऱ्यांचे प्रभावी व्यवस्थापन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.