Apple iPhone SE 5G : अ‍ॅपल (Apple) ने 'पीक परफॉर्मन्स' ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान सर्वात स्वस्त 5G iPhone लाँच केला आहे. अ‍ॅपलने iPhone SE 3 5G फोन लाँच केला आहे. यापूर्वी अ‍ॅपलने मार्च 2016 मध्ये iPhone SE मॉडेल लाँच केले होते. 'पीक परफॉर्मन्स' इव्हेंट कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आले की, Apple iPhone SE 3 5G स्मार्टफोनमध्ये A15 Bionic प्रोसेसर दिला जात आहे. हा फोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.


सध्या Apple ने आपल्या नवीन 5G iPhone SE 2022 च्या डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. परंतु जुन्या iPhone SE 2020 च्या तुलनेत चिपसेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, तर नवीन स्मार्टफोनचा लूक जुन्या iPhone SE 2020 सारखा आहे.


या फोनची खासियत म्हणजे यात होम बटणाचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय याचा डिस्प्ले कमी करण्यात आला आहे. iPhone SE 2022 मध्ये नवीन iOS सपोर्ट आहे. सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा असलेला कंपनीचा 5G सपोर्ट स्मार्टफोन आहे. Apple iPhone SE स्मार्टफोनमध्ये SE म्हणजे स्पेशल एडिशन.


Apple च्या नवीन iPhone SE 2022 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, जागतिक बाजारात याची किंमत 429 डॉलर (सुमारे 33,000 रुपये) इतकी आहे. सध्या भारतात या आयफोनची किंमत 43,900 रुपयांपासून सुरू होईल. ग्राहकांसाठी, हा iPhone SE 2022 आणि तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ज्यामध्ये 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज पर्याय उपलब्ध असेल.


सध्या, iPhone SE 2022 च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, याला iPhone 13 प्रमाणेच ग्लास प्रोटेक्शन असलेली 4.7 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. या iPhone ला 5G सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन 12MP च्या सिंगल रियर कॅमेऱ्यासह येईल. हा आयफोन तीन रंगात उपलब्ध असेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha