Best Cover For Smartphone : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती झाली आणि साध्या मोबाईलचे स्मार्टफोनमध्ये रूपांतर झाले. आता बहुतेक लोक स्मार्टफोन वापरतात. फोन स्मार्ट झाला मात्र आता तो पूर्वीसारखा मजबूत नाही. फीचर्सच्या बाबतीत हँडसेट जसजसे चांगले होत गेले, तसतसे त्याची ताकद कमी होत गेली. आजकाल जे स्मार्टफोन बाजारात येत आहेत, ते खाली पडले तर त्यांची स्क्रीन तुटण्याची भीती असते. यासाठी तुमच्या स्मार्टफोनचं कव्हर चांगलं असणं गरजेचं आहे.


बाजारात अनेक प्रकारचे कव्हर उपलब्ध आहेत. यातील अनेक कव्हर अशीही आहेत की ती फोनवर लावल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. या ठिकाणी जाणून घेऊयात की कोणत्या प्रकारचे कव्हर तुमच्या मोबाईलचं नुकसान होऊ शकते आणि कोणत्या प्रकारचे कव्हर वापरणे योग्य आहे.


प्लॅस्टिक कव्हरचा वापर :


स्मार्टफोनची बहुतेक कव्हर प्लास्टिकची असतात. जेव्हा स्मार्टफोन पडतो, तेव्हा ते त्याची स्क्रीन तुटण्यापासून देखील वाचवते. मात्र, प्लास्टिक कव्हरमुळे तुमच्या स्मार्टफोनचे नुकसान होऊ शकते. प्लास्टिक हे उष्णतावाहक आहे. अशा परिस्थितीत, यापासून बनवलेले कव्हर स्मार्टफोन अधिक गरम करू शकतात. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनचे नुकसान होऊ शकते. 


चार्जिंगमध्ये समस्या


काही प्लास्टिक कव्हर असे असतात ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन चार्जिंग केबलशी योग्यरित्या कनेक्ट होऊ शकत नाही. कधीकधी यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचे कव्हरही काढावे लागते. यासाठी ते कव्हर खरेदी करू नका ज्यामध्ये चार्जिंग केबल जोडली जाऊ शकत नाही.


मेटल कव्हर्स देखील घातक


जरी मेटल कव्हर्स स्मार्टफोनमध्ये उष्णता वाढू देत नाहीत, परंतु या कव्हर्समुळे काही समस्या देखील उद्भवू शकतात. पहिली म्हणजे ते वॉटरप्रूफ नाहीत आणि जर ते पाण्यात पडले तर त्यांना गंज देखील लागू शकतो. मेटल कव्हर्स स्मार्टफोन पडल्यावर त्याचे संरक्षण करू शकत नाहीत.


कोणतं कव्हर चांगलं?


स्मार्टफोन कव्हरचे अनेक प्रकार असले तरी स्मार्टफोन पडल्यामुळे होणारे नुकसान तेव्हाच कमी करता येते जेव्हा तुमच्याकडे लवचिक तसेच स्टायलिश आणि मजबूत कव्हर असेल. यासाठी सॉफ्ट सिलिकॉन कव्हर निवडणे हा उत्तम पर्याय आहे.


सॉफ्ट सिलिकॉन कव्हर


बाजारात अनेक प्रकारचे सिलिकॉन कव्हर उपलब्ध आहेत. काही लोक सिलिकॉनच्या नावाने प्लास्टिकचे कव्हर्स विकतात त्यामुळे सिलिकॉन कव्हर्स खरेदी करताना काळजी घ्या. सिलिकॉन कव्हर इतके मऊ आहे की इतर कोणतेही आवरण त्याच्या तुलनेत इतके मऊ असू शकत नाही. सिलिकॉन कव्हरची लवचिकता सर्वात जास्त आहे. सिलिकॉन कव्हर बाजारात 100 ते 150 किंमतीच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Retirement Planning : रिटायरमेंटनंतरच्या सुखी आयुष्यासाठी 24 टक्के भारतीय करतात गुंतवणूक; अभ्यासातून माहिती समोर