Whatsapp Reaction Feature : व्हॉट्सअप आपल्या यूजर्ससाठी नेहमीच वेगवेगळे नवीन फीचर्स घेऊन यूजर्सना आश्चर्यचकित करत असतात. Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने अलीकडेच पर्सनल आणि ग्रूप चॅटसाठी इन-चॅट मेसेज रिएक्शन देण्यास सुरुवात केली आहे. हे फीचर आधीपासूनच फेसबुक, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामवर होते. आता ते व्हॉट्सअप सुद्धा आले आहेत. 


हे नवीन फीचर नेमकं काय याची तुम्हाला अजून कल्पना आली नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. 


नवीन फीचर अपडेट हे सध्या टप्प्या टप्प्याने होत आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा मोबाईल अपडेट करावा लागेल. एकदा हे फीचर अपडेट झालं की तुम्हाला त्याचा अगदी सहज लाभ घेता येऊ शकतो. यामध्ये तुम्ही फक्त मेसेजना थम्स अप, रेड हार्ट, हसण्याचे चिन्ह, आणि रडण्याचे चिन्ह, आणि नमस्कार एवढेच इमोजी वापरण्याची परवानगी आहे. 


 व्हॉट्सअप फीचर कसे वापरावे ? 



  • सर्वप्रथम, तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट करा. जर तुमचे व्हॉट्सअप अपडेट नसेल तर Google Play Store वर जाऊन अपडेट करा. 

  • आता पर्सनल किंवा ग्रूप चॅट निवडा. 

  • आता चॅटमधीलमेसेजवर टाईप करा. आणि 2-3 सेकंद धरून ठेवा. हे मेसेज पाठवणे आणि रिसिव्ह करणे या दोन्हीसाठी लागू होते. 

  • आता तुमच्या समोर अनेक इमोजींचे पर्याय उपलब्ध असतील.    

  • आता तुम्हाला जी रिएॅक्शन द्यायची असेल ते इमोजी सिलेक्ट करून समोरच्या व्यक्तीला पाठवा. आणि नवीन फीचरचा आनंद घ्या. 


महत्वाच्या बातम्या :