WhatsApp New feature : व्हाट्सअॅप नेहमीच यूजर्ससाठी नवीन फीचर्स लॉन्च करतात. या नवीन फीचर्समुळे यूजर्सना जास्तीत जास्त सुविधांचा लाभ घेता येतो. आता आम्ही तुम्हाला अशाच एका नवीन फीचरची माहिती देणार आहोत. अर्थात, या फीचरचा फायदा सगळेच यूजर्स घेऊ शकत नाहीत. सध्या फक्त हे नवीन फीचर बिटा यूजर्ससाठीच उपलब्ध आहे. 


रिपोर्ट्सनुसार, व्हाट्सअॅपने हे फीचर आयओएस बीटा व्हर्जनमध्ये वापरले आहे. हे नवीन फीचर 22.2.72 अपडेटेट आहे. यासाठी यूजर्सना सेटिंगमध्ये जाऊन मॅनेज नोटिफिकेशन केल्यानंतर ऑन बटणावर क्लिक करायचे आहे. या फीचरच्या डिझाईनच्या बाबतीत म्हणायचे तर, मेसेज रिअॅक्शन फीचर यूजर्सना एका मेसेजवर वेगवेगळे इमोजी पाठविण्याचा पर्याय देणार आहेत. 


व्हाट्सअॅपचे हे नवीन फीचर आयओएस बीटा व्हर्जनमध्ये आले आहे. यानंतर काही टेस्टिंग करून हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. पहिल्यांदा हे iOS यूजर्ससाठी स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. या नवीन फीचरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सना व्हाट्सअॅप बीटाच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. इथे तुम्हाला रिअॅक्शन नोटिफिकेशनवर क्लिक करून तुम्ही या फीचरचा लाभ घेऊ शकता. या फीचरचा वापर करण्यासाठी दोन्ही यूजर्सना सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर अपडेट करावे लागेल. 


Android OS च्या बाबतीत म्हणायचे तर, व्हाट्सअॅपने नुकत्याच एक नवीन पेन्सिलचा पर्याय देणारं ड्रॉ टूल सादर केलं होतं. या फीचरमधून यूजर्स इमेज किंवा व्हिडीओवर कोणतीही डिझाईन करू शकतात. या अपडेटवर सध्या प्रक्रिया सुरु आहे.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha