Samsung Galaxy Tab A8 launched in India : दक्षिण कोरिया तंत्रज्ञान कंपनी सॅमसंगने (Samsung) भारतात त्यांचा नवीन टॅबलेट Samsung Galaxy Tab A8 लॉन्च केला आहे. यात 10.5 इंचाचा डिस्प्ले असून 7,040mAh बॅटरी आहे. याशिवाय सॅमसंग टॅबलेटमध्ये क्वाड स्पीकर सेटअप आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देखील उपलब्ध आहे. हा टॅब राखाडी, गुलाबी आणि चंदेरी या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. 


Samsung Galaxy Tab A8 price in India 
हा टॅब Wi-Fi आणि Wi-Fi + LTE अशा दोन प्रकारांमध्ये येतो. WiFi सह 3 GB RAM + 32 GB स्टोरेज असणाऱ्या या टॅबची किंमत 17,999 रुपये आहे आणि 4 GB RAM + 64 GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 19,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे Wi-Fi + LTE सह 3 GB RAM + 32 GB स्टोरेज असणाऱ्या टॅबची किंमत  21,999 रुपये आहे. आणि 4 GB RAM + 64 GB स्टोरेज असणाऱ्या टॅबची किंमत 23,999 रुपये आहे.


सॅमसंग टॅबलेटची विक्री 17 जानेवारी पासून होणाऱ्या अॅमेझॉनच्या 'रिपब्लिक डे सेल 2022' दरम्यान होणार आहे. आयसीआयसीआय बॅंक कार्डधारकांना 2000 रुपयांचा कॅशबॅक आणि 4,499 रुपयांचे बुक कव्हर फक्त 999 रुपयांमध्ये दिले जाईल. या टॅबची स्पर्धा Lenovo Tab P11 सोबत होणार आहे. या 4 GB + 128 GB टॅबची किंमत  22,999 रुपये आहे. लिनोवो टॅबमध्ये 11 इंच डिस्प्ले आणि 7500mAh बॅटरी आहे.


Samsung Galaxy Tab A8 ची वैशिष्ट्ये
- या टॅबचा डिस्प्ले 10.5 इंचाचा आहे.
- हा डिस्प्ले 1,920x1,200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 80 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओसह येतो.
- टॅबमध्ये 2 GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.
- तसेच  4 GB रॅम आणि 64 GB पर्यंतचे स्टोरेज आहे.
- हा टॅब  Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
- फोटो आणि व्हिडिओंसाठी, Galaxy Tab A8 मध्ये 8-मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आहे.
- तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- Samsung Galaxy Tab A8 मध्ये 7,040mAh बॅटरी आहे. 


संबंधित बातम्या


Twitter New Features : आता Twitter Spaces ची करू शकता 'रेकॉर्डिंग', कंपनीने लॉन्च केले नवीन फीचर


Apple iPhone SE 3: बाजारात येतोय ॲपलचा सर्वात स्वस्त आयफोन; मार्चमध्ये लॉन्च होण्याची शक्यता


Amazon Deal : भन्नाट ऑफर! 75 हजारांचा Samsung स्मार्टफोन खरेदी करा फक्त 35 हजारांत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha