Whatsapp New Feature : सध्या अनेक जण वेगवेगळ्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफोर्मचा वापर करतात. सोशल मीडियावर आपण वेगवेगळ्या पोस्ट देखील शेअर करतो.  व्हॉट्स-अॅप या अॅपचा वापर लोक चॅटिंग करण्यासाठी करतात. या अॅपमधील डिपी सेट करणे, मेसेज पाठवणे, स्टेटस अपलोड करणे अशा फिचर्सचा (Whatsapp Features) वापर अनेक लोक सध्या करत आहेत. पण मेटा कंपनीचा सीइओ मार्क झुकरबर्गनं (Mark Zuckerberg) नुकतीच व्हॉट्स-अॅपच्या नव्या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरमुळे आता इमोजीद्वारे रिअॅक्शन्स देता येणार आहेत. 


व्हॉट्स-अॅपचे युझर्स गेल्या कित्येक दिवसांपासून रिअॅक्शन फिचरची उत्सुकतेनं वाट  पाहात होते. व्हॉट्स-अॅपच्या आधीच्या व्हर्जनमध्ये इमोजीचा वापर केवळ चॅटिंगमध्ये केला जायचा पण आता नव्या फिचरमुळे तुम्ही मेसेजला रिअॅक्शन देऊ शकणार आहात. मार्क झुकरबर्गनं शेअर करून आता हे फिचर लाँच झाल्याबाबत माहिती दिली आहे. मार्कनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये सहा इमोजी दिसत आहेत. यामध्ये थम्स-अप, हार्ट, लाफिंग, सरप्राइज, सॅड आणि नमस्कार असे इमोजी आहेत.


मार्क झुकरबर्गची पोस्ट


सध्या मेसेजला रिअॅक्शन देण्यासाठी व्हॉट्स-अॅप युझर्स या सहा इमोजींचा वापर करू शकणार आहेत. हे नवं फिचर वापरण्यासाठी तुम्हाला व्हॉट्स-अॅपचे  लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागणार आहे. तुमचे व्हॉट्स-अॅप अकाऊंट अपडेट झालं की तुम्ही या सहा इमोजींचा वापर रिअॅक्शन देण्यासाठी करू शकता.  


महत्वाच्या बातम्या :