Tvs New Scooter: देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी TVS ने भारतात आपली नवीन Ntorq 125 XT स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर नवीन टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. तसेच हे SmartXonnectTM कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्मसह हायब्रिड TFT आणि LCD कन्सोलसह येते. यात 'SmartXTalk' - अॅडव्हान्स व्हॉईस असिस्ट आणि सोशल मीडिया अलर्ट, बातम्या आणि हवामान फीचर्ससाठी 'SmartXTrack' सारख्या 60 हून अधिक नवीन कनेक्टिव्हिटी फीचर्स यात देण्यात आले आहेत. 


व्हॉईस असिस्ट हे फीचर असणारे Ntorq 125 XT ही पहिलेच स्कूटर आहे. आता हे स्कूटर थेट व्हॉइस कमांड स्वीकारू शकते. Ntorq 125 XT स्कूटरचे अशा प्रकारचे पहिले व्हॉईस असिस्ट वैशिष्ट्य आता थेट व्हॉइस कमांड स्वीकारू शकते. स्कूटरला स्टार्ट-स्टॉप फंक्शनसह TVS IntelliGO टेक्नॉलॉजी देखील मिळते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची नवीन हलकी आणि स्पोर्टियर अलॉय व्हील्स, ज्यामुळे इंधनाची बचत करताना याची चांगली परफॉर्मन्स पाहायला मिळते.


फीचर्स 


TVS Ntorq 125 XT मध्ये रायडर्सना फूड डिलिव्हरी स्टेटस देखील ट्रॅक करता येणार आहे. असे फीचर्स असलेली ही देशातली पहिलीच स्कूटर आहे. हे नवीन ट्रॅफिक टाइम स्लाइडर स्क्रीनसह देखील येते. जे रायडर्सना ट्रॅफिक सिग्नलवर थांबण्याच्या वेळेसह क्रिकेट आणि फुटबॉल स्कोअर, लाईव्ह AQI, बातम्या आणि बरेच अपडेट पाहण्यास मदत करू शकते. ही स्कूटर ब्लूटूथ टेक्नॉलॉजी TVS SmartXonnectTM प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. जे TVS Connect मोबाइल अॅपसह जोडण्यात आले आहे. हे अॅप्लिकेश  Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे.


किंमत आणि फीचर्स 


स्कूटरमध्ये 124.8 cc थ्री-वॉल्व्ह एअर-कूल्ड रेस-ट्यून्ड फ्यूल इंजेक्शन (RT-Fi) इंजिन देण्यात आले आहे. जे 7,000 rpm वर 6.9 kW ची पॉवर आणि 5,500 rpm वर 10.5 Nm चे पीक टॉर्क आउटपुट निर्माण करते. स्टाइलिंगच्या बाबतीत, स्कूटरला नियॉन ग्रीन नावाची नवीन पेंट स्कीम मिळते. जी या लाईन-अपमधील इतर स्कूटरपेक्षा याला वेगळी बनवते. दिल्लीत याची एक्स-शोरूम किंमत 1,02,823 रुपये आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI