Gadgets Cooling Tips : उन्हाळ्यात जसे आपले शरीर तापते तशाच इलेक्ट्रॉनिक वस्तूही लवकर तापतात. मग ते स्मार्टफोन असो, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू या सगळ्यांची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. उन्हाळ्यात तुमचे गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा. 


इलेक्ट्रॉनिक वस्तूंना सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा 


तुम्ही गॅझेट्सना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. कारण तीव्र सूर्यप्रकाशामुळे तुमच्या वस्तू लवकर गरम होतात आणि त्यातल्या इंटर्नल पार्ट्सचे नुकसान देखील होऊ शकते. 


स्मार्टफोन वारंवार खिशात ठेवू नका


तुमचा स्मार्टफोन नेहमी तुमच्या खिशात ठेवू नका. विशेषत: जेव्हा तुम्ही उष्ण वातावरणाच्या ठिकाणी असता तेव्हा तुमचा स्मार्टफोन अधिक काळ खिशात ठेवू नका. 


घराबाहेर चार्ज करू नका


तुम्ही तुमचे गॅझेट बाहेर चार्ज करणे टाळा. कोणतेही गॅझेट चार्ज केल्याने त्याचे तापमान थोडेसे वाढते. तसेच घराबाहेर ते वापरले जात असल्यास, उष्णतेमुळे तापमान वाढू शकते आणि डिव्हाइस जास्त गरम होऊ शकते. त्यामुळे घराबाहेर चार्ज करू नका. 


कारमध्ये गॅझेट ठेवू नका


जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा स्मार्टफोन (गॅझेट) कारच्या आत ठेवणे योग्य आहे, तर तसे करू नका. उन्हाळ्यात ड्रायव्हिंग केल्याने तुमच्या गाडीचेही तापमान वाढते. गॅझेट आत ठेवल्याने जास्त गरम होऊ शकते. म्हणून कारमध्ये गॅझेट ठेवू नका.


महत्वाच्या बातम्या :