WhatsApp New Privacy Feature Update : व्हॉट्सॲपवर (WhatsApp) आता तुम्हाला स्क्रिनशॉट (Screenshot) काढता येणार आहे. कंपनी व्हॉट्सॲपवर स्क्रिनशॉट काढण्यावर (Screenshot Blocking Feature) बंदी आणण्याच्या विचारात आहे. यासाठी कंपनीकडून नवीन फिचरची तपासणी सुरु आहे. अनेक दिवसांपासून या फिचरची मागणी करण्यात येत होती. हे फिचर आल्यास युजर्सना एकदा पाहामध्ये पाठवलेल्या फोटो किंवा व्हिडीओचा स्क्रनशॉट काढता येणार नाही.


वन टाईम वॉच मीडियाचे स्क्रिनशॉट काढता येणार नाहीत


व्हॉट्सॲपने (WhatsApp) गेल्या वर्षी स्नॅपचॅट सारखं फिचर आणलं आहे. यामध्ये युजर्सना एक मीडिया एकदा पाहण्याची (View Once Option) परवानगी असते. मात्र या फिचरमध्ये त्रुटी आहेत, कारण युजर्स हा वन टाईम मीडियाचे स्क्रिनशॉट काढू शकतात. ज्यामुळे या फीचरच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर आता यावर उपाय म्हणून स्क्रिनशॉट घेण्यावर बंदी आणणार आहे.

 


(PC : WABetaInfo)


कंपनीकडून व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फिचरवर काम सुरु


व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच जाहीर केलं आहे की कंपनी व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फिचरवर काम करत आहे. यामध्ये युजर्सच्या स्क्रीनशॉट घेण्यावर बंदी येईल. सध्या बीटा वापरकर्त्यांसाठी हे फिटर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही युजर्सच्या मेसेजचं संरक्षण करण्यासाठी आणि ते खाजगी तसेच सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू.'






सोशल मीडिया अपडेट शेअरिंग वेबसाइट, WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फिचर सुरु झाल्यानंतर जेव्हा युजर्स एकदा पाहिल्या गेलेल्या मीडियाचा  (View Once Option) स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा युजर्सना एक मेसेज दिसेल की, 'सुरक्षा धोरणामुळे स्क्रीनशॉट घेता येणार नाही' (Can’t take screenshot due to security policy).