Jio True 5G : जिओ (Jio) युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओने (Reliance Jio) भारतात 5G सेवा (5G Service) सुरू करण्याची घोषणा केली आहे. जिओ आज दसऱ्याच्या मुहूर्तावर जिओ 5G (Jio 5G) सेवा सुरु करणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ चार शहरांमध्ये Jio 5G इंटरनेट सुरु करण्यात येणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या देशातील चार शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. आजपासून जिओच्या True 5G सेवेची बीटा चाचणी सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही सेवा केवळ निवडक युजर्सना वापरता येणार आहे सध्याच्या जिओ युजर्सपैकी काही निवडक युजर्सना Jio True 5G सेवा वापरण्यासाठी आमंत्रण पाठवले जाईल. केवळ त्याचं ग्राहकांना ही सेवा वापरता येणार आहे.


या युजर्सना एक स्पेशल ऑफर देखील देण्यात येणार आहे. यामध्ये युजर्सना 1Gbps पर्यंतचा वेग आणि अमर्यादित 5G डेटा मिळेल. आमंत्रित वापरकर्त्यांना Jio True 5G सेवेचा अनुभव घेता येईल आणि त्यांच्या अनुभवांच्या आधारे कंपनी सर्व ग्राहकांसाठी एकत्रित 5G सेवा सुरू करेल.


Jio True 5G वेलकम ऑफर (Jio True 5G Welcome Offer)



  • Jio True 5G वेलकम ऑफर मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी येथील Jio ग्राहकांसाठी आमंत्रणाद्वारे सुरू केली जाणार आहे.

  • या ग्राहकांना 1 Gbps पर्यंत स्पीडसह अलिमिटेड 5G डेटा मिळेल.

  • या चार शहरांनंतर इतर शहरांसाठी बीटा चाचणीची घोषणा केली जाईल.

  • या शहरामधील नेटवर्कचं जाळं पूर्ण पसरेपर्यंत युजर्सना बीटा चाचणीचा फायदा घेता येईल. 

  • आमंत्रित केलेल्या ग्राहकांना 'जिओ वेलकम ऑफर' वापरकर्त्यांना त्यांचं सध्याचं जिओ सिम बदलावं लागणार नाही. जुनं सिमकार्ड आपोआप जिओ ट्रू 5G सेवेत आपोआप अपग्रेड होईल, मात्र यासाठी युजर्सकडे 5G मोबाईल असणं आवश्यक आहे.


जिओची बीटा टेस्ट (Jio Beta Test)


रिलायन्सने सांगितलं आहे की, ही जिओ 5G ची बीटा चाचणी आहे. बीटा चाचणी संपूर्ण देशात जिओ 5G सेवा लाँच होण्यापूर्वीचा एक टप्पा आहे. यामध्ये ग्राहकांचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार 5G नेटवर्कमध्ये बदल करण्यात येईल. जिओने सांगितलं आहे की, कंपनी आपल्या 425 दशलक्ष युजर्सना 5G सेवेचा नवीन आणि उत्कृष्ट अनुभव देऊ इच्छितो. याद्वारे भारताला डिजिटल क्रांती घडेल.