WhatsApp New Feature : व्हॉट्सअॅप (WhatsApp)  नवे फिचर जाहीर केले आहेत. यानुसार आता एका ग्रुपमध्ये तब्बल 1024 सदस्य जोडता येणार आहेत. तर, व्हॉट्सअॅपच्या व्हिडीओ कॉलवर आता 32 जण सहभागी होऊ शकतील. व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी नव्या फिचर्सबाबत काल ही घोषणा केली. व्हॉट्सअॅपवर आता 2 जीबीपर्यंत फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करता येणार आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये इन-चॅट पोलदेखील घेता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्रुपमधील सदस्य एखाद्या प्रश्नावर आपले मत नोंदवू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपने हे फीचर कसे दिसेल आणि त्याची कार्यक्षमता अद्याप उघड केलेली नाही. नवीन फीचर्ससाठी व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. 


व्हॉट्सअॅपवरील समुदाय (community) हे फीचर वेगवेगळ्या लोकांच्या गटांना (groups) एकाच ठिकाणी एकत्र आणण्यास मदत करेल. थोडक्यात सागायचे झाल्यास, तुम्ही आता व्हॉट्सॲपवर ग्रुपचा ग्रुप बनवू शकता. हे लोकांना संपूर्ण समुदायाला कोणतीही माहिती पाठविण्यास आणि प्राप्त करण्यास मदत करेल. या माध्यमातून यूजर्सना वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर ग्रूप चर्चादेखील आयोजित करण्यात मदत करेल. हे कम्युनिटी फिचर वापरण्यासाठी, यूजर्सना Android वर चॅटच्या शीर्षस्थानी नवीन समुदाय (New Community)  टॅबवर टॅप करणे आवश्यक आहे.


इन-चॅट मतदान (पोल)


व्हॉट्सअॅपने हे फीचर आणण्यापूर्वीच इन-चॅट पोल फीचरची चाचणी सुरू केली होती. जसे की, ट्विटर किंवा फेसबुकवर ज्याप्रकारे पोल तयार करून लोकांच्या प्रतिक्रिया घेता येतात. अगदी तशाच प्रतिक्रिया पोलद्वारे यूजर्सना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये घेता येणार आहेत. बीटा व्हर्जन पाहिल्याप्रमाणे, WhatsApp तुम्हाला इन-चॅट पोलवर एक प्रश्न तयार करू देईल आणि अॅपमधील एका स्वतंत्र स्क्रीनमध्ये 12 पर्यंत संभाव्य उत्तरे जोडण्याची परवानगी देईल. व्हॉट्सअॅपने अद्याप हे फीचर कसे दिसेल याबाबत खुलासा केलेला नाही. नवीन फिचर मिळविण्यासाठी, तुम्हाला तुमचे WhatsApp Play Store किंवा App Store वरून अपडेट करावे लागेल.


एकाच वेळी 1024 लोकांचा ग्रुप आणि 32 लोकांचा व्हिडीओ कॉल


आजपासून WhatsApp तुम्हाला एका ग्रुपमध्ये 1024 पर्यंत सदस्य जोडण्याची सुविधा देत आहे. आत्तापर्यंत, तुम्ही एका ग्रुपमध्ये 256 पेक्षा जास्त लोकांना जोडू शकत नव्हते. तुम्ही एका ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये 32 लोकांना आता जोडू शकता. याशिवाय व्हॉट्सअॅपने मोठी फाईल शेअरिंग म्हणजे जवळपास (2 GB) पर्यंत, इमोजी रिअॅक्शन आणि अॅडमिन डिलीट फीचर देखील आणले आहे जे समुदायांमध्ये (community) खूप उपयुक्त ठरेल.


महत्वाच्या बातम्या : 


Twitter कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, आजपासून मस्क यांच्याकडून कर्मचारी कपात करण्यास सुरुवात