China Space Debris Threat to Earth : चीनने ( China ) पुन्हा एकदा पृथ्वीला ( Earth ) धोक्यात टाकलं आहे. चीनच्या स्पेस रॉकेटचे ( China Space Rocket ) अवशेष पृथ्वीवर कोसळणार आहेत. रॉकेटचे हे अवशेष चीन ( China ) आणि भारतासह ( India ) अमेरिका ( America ) आणि आफ्रिकेमध्ये ( Africa ) कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिनी रॉकेटचा 25 टन वजनी घनकचरा पृथ्वीवर कोसळणार असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. चायना मँड स्पेस एजेन्सीने ( CMSA - China Manned Space Agency ) 31 ऑक्टोवर रोजी तियांगोंग स्पेस स्टेशनवरून ( Tiangong Space Station ) तिसरं मॉड्यूल लाँग मार्च-5बी हेवी-लिफ्ट रॉकेट ( Chinese Long March 5B Rocket ) लाँच केलं होतं. पण हे रॉकेट ठरलेल्या स्पेस ऑरबिटमध्ये पोहोचण्यात अयशस्वी ठरलं. त्यामुळे या रॉकेट अनियंत्रित झालं असून त्याचे तुकडे पृथ्वीवर कोसळणार आहेत. आता पृथ्वी अवशेष आता अंतराळात फिरत असून ते लवकरच पृथ्वीवरील वातावरणाच्या कक्षेत पोहोचणार आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, या रॉकेटच्या अवशेषांचं वजन 25 टन आहे. लवकरच हा घनकचरा पृथ्वीवर कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. अंतराळ संशोधकांच्या अंदाजानुसार, या रॉकेटचे अवशेष 5 नोव्हेंबर रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतील. त्यानंतर या रॉकेटचे अवशेष भारत, चीन, अमेरिका किंवा आफ्रिका या देशांमधील काही भागांत कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


द एयरोस्पेस कॉर्पोरेशन सेंटर फॉर ऑर्बिटल अँड रीएंट्री डेब्रिस स्टडीजच्या शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 5 नोव्हेंबर रोजी रात्री 11.51 मिनिटांनी चिनी स्पेस रॉकेटचा घनकचरा पृथ्वी वातावरणात पोहोचण्याची शक्यता आहे. या रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर नेमक्या कुठल्या ठिकाणी कोसळणार आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी भारत, चीन, अमेरिका, आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.






दोन वर्षात चौथ्या वेळेस कोसळणार रॉकेटचे अवशेष


दोन वर्षात चौथ्या वेळेस चिनी रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कोसळणार आहेत. याआधी जुलै महिन्यामध्ये चीनच्या एका रॉकेटचे अवशेष फिलिपिन्सच्या समुद्रामध्ये कोसळले होते. पृथ्वीवर कोसळणारं हे चिनी रॉकेट सुमारे 25 टन वजनाचं आहे आणि या धातूचा 40 टक्के भाग पृथ्वीवर कोसळणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. हे रॉकेट कोसळल्याने होणारी हानी आणि धोका कमी आहे. मात्र धोक्याची शक्यता पूर्णपणे टाळता येणार नाही.


अमेरिकेला टक्कर देण्याचा चीनचा प्रयत्न


चीन अमेरिकेला टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा नवनवीन शोध करण्याच्या प्रयत्नात आहे. याच पार्श्वभूमीवर चीनकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. चीनला अमेरिकेची अंतराळ संस्था नासाशी स्पर्धा करून अंतराळात आपलं अस्तित्व वाढवायचं आहे. यासाठी चीन एकामागून एक अंतराळ मोहीमा करत असून स्वतःच्या अंतराळ स्थानकाचीही ( Space Station ) निर्मिती करत आहे.


चीनच्या स्पेस स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात


चीनच्या अंतराळ स्थानकाचं ( Space Station ) काम शेवटच्या टप्प्यात पोहोचलं आहे. चीनचं शेवटचं लॅब मॉड्यूल ( Lab Module ) निर्माणाधीन स्पेस स्टेशनवर पोहोचलं आहे. चिनी स्पेस स्टेशनचं शेवटचं लॅब मॉड्यूल ‘मँग्शन’ मंगळवारी स्पेस स्टेशनवर पोहोचलं असून आता अंतराळ स्थानकाचं काम अंतिम टप्प्यात आहे.