Google नं प्ले स्टोअरवरुन क्रिप्टोकरंसीचे आठ अॅप डिलिट केले आहेत. दावा असा केला जातोय की, या अॅप्सच्या मदतीनं हॅकर्स युझरच्या अकाऊंटची डिटेल्स लीक करत होते. हे धोकादायक अॅप्स गुगलनं काढून टाकले आहेत. यात BitFunds, Bitcoin अशा अॅप्सचा समावेश आहे. जर तुमच्याही मोबाईलमध्ये असे अॅप्स असतील तर तात्काळ हे अॅप्स आपल्या मोबाईलमधून डिलिट करा. या अॅप्सच्या मदतीनं यूझर्सच्या अकाऊंटची डिटेल्स लीक करुन आर्थिक फटका बसू शकतो.
हॅकर्स क्रिप्टोकरंसीसाठी हे अॅप्स इंस्टॉल केल्यानंतर अॅडच्या माध्यमातून एक व्हायरस पाठवायचे. ज्या माध्यमातून वापरकर्त्यांची माहिती सहज लीक व्हायची. यामुळं गुगलनं आता असे अॅप्स डिलिट केले आहेत.
सेक्युरिटी फर्म Trend Micro च्या रिपोर्टनुसार या आठ अॅप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांना जाहिराती पाहाव्याच लागायच्या. या अॅप्स यूझर्सकडून 1,115 रुपयांचं महिन्याकाठी सब्सक्रिप्शन देखील घेतलं जायचं. सोबतच अकाऊंटची महत्वाची माहिती हॅकर्सकडे यायची.
ही आहेत ती धोकादायक अॅप्स, जी लगेच आपल्या फोनमधून काढा
BitFunds – Crypto Cloud Mining
Bitcoin Miner – Cloud Mining
Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
Crypto Holic – Bitcoin Cloud Mining
Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System
Bitcoin 2021
MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner
Ethereum (ETH) – Pool Mining Cloud