WhatsApp Bans: व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यात भारतातील 23 लाख अकाउंट बंद केले होते. व्हॉट्सअॅपने बुधवारी सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ऑक्टोबर महिन्यात 2.3 मिलियनहून अधिक अकाउंट बंद केली आहेत. कंपनीने म्हटले आहे की, हे पाऊल नवीन IT नियम 2021 अंतर्गत उचलण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, "व्हॉट्सअॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवांमधील गैरवापर टाळण्यासाठी हे केले गेले आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर नवीनतम तंत्रांचा वापर केला आहे. आमच्या युजर्सला आमच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ठेवता यावे यासाठी हे केले गेले आहे.''


व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आयटी नियम 2021 नुसार आम्ही ऑक्टोबर 2022 महिन्यासाठी आमचा अहवाल प्रकाशित केला आहे. या युजर्स सुरक्षा अहवालात युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि व्हॉट्सअॅपने केलेल्या कारवाईचा संपूर्ण तपशील देखील समाविष्ट आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपून घेतले जात नाही. असे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे."


कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान 2,685,000 व्हॉट्सअॅप अकाउंटच्या इन्स्टंट मेसेजिंग सेवेवर बंदी घालण्यात आली होती. यापैकी 872,000 अकाउंट सक्रियपणे प्रतिबंधित करण्यात आली होती. निवेदनानुसार, युजर्सच्या तक्रारींना प्रतिसाद देणे आणि कारवाई करण्याव्यतिरिक्त WhatsApp ने प्लॅटफॉर्मवर गैरवर्तन टाळण्यासाठी नवीन फीचर देखील आणले आहेत.






व्हॉट्सअॅपनुसार, अकाउंटमधील त्रुटी शोधण्याचं काम तीन टप्प्यांवर केलं जात. यात व्हॉट्सअॅप रजिस्टरची वेळ, संदेश पाठवताना आणि ब्लॉक्सच्या स्वरूपात आम्हाला प्राप्त झालेल्या कोणत्याही नकारात्मक टिप्पण्यांच्या प्रतिसादाचा समावेश आहे. निवेदनात म्हटले आहे की, तज्ञांची एक टीम एज केसेसचे मूल्यांकन करण्यात आणि वेळेनुसार व्हॉट्सअॅपची ऑथॉरिटी सुधारण्यात मदत करेल. ज्यामुळे युजर्सचा विश्वास वाढण्यास आणि प्लॅटफॉर्मवरील तक्रारींचे निराकरण करण्यात मदत होईल.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Apple iPhone 15 सीरीजमध्ये होणार मोठे बदल; डिझाईनसह लूकही बदलणार