Keyboard Fact : विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. संगणकाच्या शोधाने अनेक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. आजच्या काळात संगणक आणि कीबोर्ड आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाले आहेत. ऑफिस असो की ऑनलाईन क्लास, संगणक आणि कीबोर्ड ही आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात मूलभूत गरज बनली आहे. कीबोर्ड वापरताना, तुम्ही कधी F आणि J या की-बोर्डच्या खाली डॅश हे चिन्ह का असते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? डॅश फक्त F आणि J खाली का बनवला जातो हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? याचा अर्थ काय? ही खूण का केली जाते? नसेल तर याचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या खुणा का बनवल्या जातात?
तुम्ही कीबोर्डकडे बारकाईने पाहिल्यास, तुमच्या लक्षात येईल की F आणि J की वर किंचित वाढलेले डॅश मार्क आहे. कीबोर्ड बटणांवर बनवलेल्या या डॅशचा शोध जून ई बोटीच यांनी 2002 मध्ये लावला होता. तेव्हापासून, हे कीबोर्डचं मॉडेल आज जवळपास सर्व आधुनिक कीबोर्ड मॉडेलमध्ये वापरले जात आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन पोर्टलवरील अहवालानुसार, कॉम्प्युटर कीबोर्डवरील F आणि J बटणांवर आढळणारे हे छोटे रिज कीबोर्डकडे खाली न पाहता योग्य बटण शोधण्यात मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही कीबोर्ड न पाहता टाईप केल्यास, फक्त डॅशला स्पर्श करून कोणते बटण कुठे आहे ते तुम्ही शोधू शकता. जर तुम्ही हे दोन डॅश नीट वापरायला शिकलात तर त्यामुळे तुमच्या टायपिंगचा वेग वाढतो आणि कीबोर्ड वापरायला सोपा होतो.
F आणि J च्या मदतीने टायपिंग केले जाते.
- सर्वप्रथम तुमच्या डाव्या आणि उजव्या हाताची बोटे अनुक्रमे 'F' आणि 'J' बटणाच्या वर ठेवा.
- त्यानंतर तुमचा डावा हात तुमच्या बोटाने A, S, D आणि F बटणाकडे झाकतो.
- त्याचप्रमाणे, उजव्या हाताने J, K, L आणि कोलन बटणे झाकली आहेत आणि तुमचे दोन्ही अंगठे स्पेस बारवर असले पाहिजेत.
या दोन कीबोर्डची बटणे एम्बॉस करण्याची कल्पना प्रथम जून ई. बोटिश यांनी मांडली होती. फ्लोरिडा येथील रहिवासी असलेल्या बोटिश यांनी एप्रिल 2002 मध्ये ही कल्पना प्रत्यक्षात आणली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ही बटणे QWERTY आणि Dvorak दोन्ही कीबोर्डवर आढळतात.
महत्वाच्या बातम्या :