Long Validity Pre Paid Plans : सध्या बाजारात अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या सोयींसुविधांनी युक्त असे रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या वतीनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन ऑफर्स उपलब्ध करुन दिल्या जातात. आज बाजारात स्वस्त आणि महागडे असे अनेक प्लान वेगवेळ्या ऑफर्ससह उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टेलिकॉम कंपन्यांच्या खास प्लान्सबाबत सांगणार आहोत. ज्यांची व्हॅलिडिटी बराच काळ असते, अशा प्लान्सबाबत जाणून घेऊया... 


प्रीपेड प्लान्समध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंगचे प्लान्सना युजर्सकडून सर्वाधिक पसंती मिळते. आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vi यांच्या 400 रुपयांहून कमी किंमत असणाऱ्या प्लान्साबाबत सांगणार आहोत. या सर्व प्लान्समध्ये बऱ्याच काळाची व्हॅलिडिटी मिळते. त्यासोबतच अनलिमिटेड वॉईस कॉलिंगची सुविधाही मिळते. 


Jio चा प्लान


जिओचा जो 399 रुपयांचा प्लान आहे, त्याची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. यामध्ये युजर्सना दरदिवशी 1.56 GB डेटा मिळतो. 
या प्लानमध्ये Jio चे कॉम्पलिमेंटरी अॅप्स म्हणजेच, Jio TV, Jio Cinema यांचं सब्सक्रिप्शन मिळतं. 
हा प्लान रेग्युलर युजर्ससाठी सुरु करण्यात आला आहे. 
जिओचा 84 दिवसांची व्हॅलिडिटी असणारा कोणताही प्लान 400 रुपयांहून कमी किमतीत येत नाही. 


Vi चा प्लान


Vi 379 रुपयांचा प्रीपेड प्लान काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाला आहे. 
याची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. 
अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच 6GB डाटा यूजर्सना मिळतो.  
1000 फ्री SMS ही युजर्सना मिळतात. हे एसएमएस युजर्स प्लानच्या व्हॅलिडिटीपर्यंत वापरु शकतात.  


Airtel चा प्लान


एअरटेलचा 379 रुपयांचा प्रीपेड प्लान 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येतो.  
अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच डाटाही मिळतो.  
या प्लानमध्ये यूजर्सना एकूण 6GB डाटाचा लाभ मिळतो. युजर्स याचा वापर 84 दिवसांपर्यंत करु शकतात.  
कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉईस कॉलिंगची सुविधाही मिळते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :