Airtel vs VI vs Jio : दोन दिवसापूर्वी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅनसच्या दरांत 20-25 टक्क्यांची वाढ जाहीर केली. हे नवे दर 26 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. एअरटेल, जिओ आणि व्हीआय (Idea- Vodafone) या तीन कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनमधील फरक जाणून घेऊयात. 


एअरटेल आणि जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन 10 रुपयांच्या प्लॅनमध्ये 7.47 रुपयांचा टॉकटाईम आहे. यात डेटा नाही. तर,  व्हीआयचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन 19 रुपयांचा आहे. यामध्ये अनलिमिडेड कॉलिंग सुविधासह 200एमबी डेटाचा समावेश आहे.


28 दिवसांची वैधता असलेला प्लॅन (Unlimited calling plans) :


एअरटेल :
एअरटेलच्या प्रीपेड प्लॅनच्या दरामध्ये 26 नोव्हेंबरपासून 20-25 टक्क्यांची होणार आहे. एअरटेलचा सध्याचा 79 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता 99 रुपयांचा होणार आहे. ज्यामध्ये 50टक्के जास्त टॉकटाईम आणि 200एमबी डेटा मिळेल. याशिवाय 149 रुपयांचा प्लॅन आता 179 रुपयांना मिळेल. यामध्ये दिवसाला 100 एसएमएस आणि 1 जीबी डेटा मिळेल. तर 299चा प्लॅन 359 रुपयांना मिळणार आहे. यात दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळेल.


जिओ :
24 दिवसांची वैधता असणाऱ्या जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 एसएमएस दिवसाला 1 जीबी डेटा मिळेल. जिओच्या 28 दिवसांच्या वैधता असलेल्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळेल, तर 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 3 जीबी डेटा मिळेल.


व्हीआय :
व्हीआयच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता असलेल्या 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसा 1 जीबी डेटा आहे. तर 28 दिवसांची वैधता असणाऱ्या दिवसाला 1 जीबी डेटाच्या प्लॅनसाठी 219 रुपये मोजावे लागतील. याच फायद्यांसह दिवसा 1.5 जीबी डेटाचा प्लॅन 249 रुपये आणि 3 जीबी डेटाचा प्लॅन 501 रुपयांना आहे. या सर्व प्लॅनमध्ये एनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएसचा समावेश आहे.


56 दिवसांची वैधता असणारे प्लॅन Unlimited calling plans :


एअरटेल -
एअरटेलच्या ग्राहकांना  56 दिवसांच्या 399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी आता 479 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100 एमएमएस आणि दिवसाला 1 जीबी डेटा असेल. तर 2 जीबी डेटाचा प्लॅन आता 449 ऐवजी 549 रुपयांना मिळणार आहे.


जिओ :
जिओचा दिवसा 1.5 जीबी डेटाचा प्लॅन 399 रुपये तर, 2 जीबी डेटाचा प्लॅन 666 रुपयांचा आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस आहेत.


व्हीआय :
व्हीआयच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसा 1.5 जीबी डेटा, 449च्या प्लॅनमध्ये दिवसा 4 जीबी डेटा मिळेल. तसेच, 701 रुपयांच्या प्लॅनमध्ये  3 जीबी डेटासह  डिज्नी प्लस हॉटस्टारचं सबस्क्रिपश्न आणइ 32 जीबी एक्स्ट्रा डेटा मिळेल. या सर्व प्लॅनमध्ये यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस आहेत.


84 दिवसांची वैधता असणारे प्लॅन Unlimited calling plans –


एअरटेल :
एअरटेलच्या 84 दिवसांच्या वैधतेसाठी 455 रुपये, 719 रुपये आणि 839 असे तीन प्लॅन आहेत. यामध्ये 455 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 6 जीबी डेटा, 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसा 1.5 जीबी डेटा आणि 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसा 2 जीबी डेटा आहे.


जिओ :
जिओच्या 1.5 जीबी डेटासाठी 555 रुपयांचा प्लॅन, दिवसा 2 जीबी डेटासाठी 888 रुपयांचा प्लॅन आणि दिवसा 3 जीबी डेटासाठी 999 रुपयांचा प्लॅन आहे.


व्हीआय :
व्हीआयच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसा 1.5 जीबी डेटा, 901 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसा 3 जीबी डेटा आणि 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसा 4 जीबी डेटा आहे. याशिवाय एकूण 6 जीबी डेटासाठी 379 रुपयांचा वेगळा प्लॅनही आहे.