Vivo V21 5G:  स्मार्टफोन  कंपनी  Vivo त्यांचा   V21 5G या फोनला नव्या रंगामध्ये लाँच केले आहे. कंपनीने आता निऑन स्पार्क हा कलर व्हेरिअंट लाँच केला आहे. आता हा स्मार्टफोन डस्क ब्लू, सनसेट डिझेल आणि आर्टिक व्हाईट कलर या रंगांसह निऑन स्पार्क रंगामध्ये देखील उपलब्ध होणार आहे.  Vivo च्या या नव्या स्मार्टफोनला मॅट ग्लास फिनिशिंग दिली गेली आहे. या फोनमध्ये  90Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनमधील काही खास फिचर्स आणि फोनची किंमत-


काय आहे किंमत?
8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह Vivo V21 5G व्हेरिएंटची किंमत 29,990 रुपये आहे. त्याचबरोबर त्याच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 32,990 रुपये ठेवण्यात आली आहे.


Amazon Great Indian Festival Sale: फक्त 10 हजारात मिळवा उत्तम क्वॉलिटीचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन


कॅमेरा 
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, Vivo V21 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देखील देण्यात आला आहे. याशिवाय 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.


Apple iPhone 13 Pro Max : आयफोनचा असाही वापर! डोळ्यांवर उपचारासाठी होतेय मदत


4,000mAh ची बॅटरी
पॉवरसाठी Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. कंपनीचा दावा आहे की हा स्मार्टफोन अर्ध्या तासात 60 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज होईल. हा फोन सनसेट डॅझल, डस्क ब्लू आणि आर्कटिक व्हाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये इंडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.


OnePlus 9RT Smartphone 2021 : दमदार फिचर्ससह वन प्लसचा क्लासी स्मार्टफोन; काय असेल किंमत?