OnePlus 9RT Smartphone 2021: वन प्लस कंपनीचे फोन्स अनेकांना आवडतात. वन प्लसचा आज OnePlus 9RT हा नवा स्मार्टफोन चिनमध्ये लाँच करणार आहेत. चिनमध्ये लाँच केल्यानंतर बाकी देशांमध्ये दखील हा फोन लवकरच लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन 9R चा अपग्रेड व्हर्जन आहे. चांगल्या परफॉर्मेंसाठी या स्मार्टफोनमध्ये 888 SoC प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच तुम्हाला या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. या फोनची जवळपास 25 हजार रूपये किंमत असू शकते.  


 OnePlus 9RTमधील स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे. हा फोन अॅंड्रॉयड 11 वर रन होणार. तसेच यामध्ये कंपनीने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. तसेच यामध्ये  6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. 


Vivo V21 5G स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिएंट 'या' दिवशी भारतात लॉन्च होणार; वाचा किंमत आणि फीचर्स?


कॅमेरा 


OnePlus 9RT या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. या फोनचा प्राइमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तसेच फोनमध्ये  16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अॅंगलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल बी अॅंड डब्ल्यू सेंसर दिला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंच कॅमेरा देखील देण्यात आला आहे. 


Vivo X70 Series चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, काय आहेत ऑफर्स? वाचा सविस्तर


बॅटरी
पाव्हरसाठी OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे जी 65W Warp चार्जिंग स्पोर्टसोबत दिली जाईल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्टसारखे फिचर्स देण्यात येतील 


Apple iPhone 13 Pro Max : आयफोनचा असाही वापर! डोळ्यांवर उपचारासाठी होतेय मदत


Google Photos : डिलीट झालेले फोटो परत मिळवायचेत? ट्राय करा 'ही' सोपी ट्रिक