पोखरण: डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तरित्या विकसित केलेल्या पिनाका मिसाईल सिस्टमच्या विकसित रुपाची आज पोखरण येथे यशस्वी चाचणी करण्यात आली. गेल्या पंधरवड्यात 24 पिनाका एमके-आय रॉकेट सिस्टमचे वेगवेगळ्या रेंजमध्ये परीक्षण करण्यात आलं होतं. पिनाका मिसाईलच्या या नव्या व्हर्जनने लक्ष्याचा अचूक भेद केला आहे. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. 


ईपीआरएस पिनाका व्हेरियंटचे विकसित रुप हे गेल्या एक दशकापासून भारतीय लष्कराच्या सेवेत आहे. संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की, अत्याधुनिक गरजा लक्षात घेता त्यांची पूर्तता करण्यासाठी या रॉकेट प्रणालीच्या नव्या रुपाचा विकास करण्यात आला आहे. पुण्यातील अर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅबिलिशमेंटन (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरटरीने (एचईएमआरएल) ही रॉकेट यंत्रणा विकसित केली आहे. अधिक टप्प्यावर मारा करण्याचे सामर्थ्य वाढविण्यासाठी पिनाका रॉकेट विकसित केलं आहे. 


 




संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन या यशस्वी परीक्षणाची माहिती दिली आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, पिनाका एमके-आय (विकसित संस्करण) रॉकेट सिस्टम (ईपीआरएस) आणि पिनाका एरिया डेनियल मुनिशन (एडीएम) रॉकेट सिस्टमचे पोखरण फायरिंग रेंजमध्ये डीआरडीओ आणि भारतीय सेनेकडून यशस्वी परीक्षण करण्यात आलं. या परीक्षणासोबत एका खासगी उद्योगाकडून ईफीआरएसच्या औद्योगिकतेची प्राथमिक पायरी पूर्ण झाली आहे. 


पिनाका मिसाईल सिस्टम ही 44 सेकंदामध्ये 12 मिसाईल लॉंच करु शकते. म्हणजेच प्रत्येक 4 सेकंदाला एका मिसाईलचे लॉंचिंग होऊ शकते. या रॉकेटची मारक क्षमता ही 7 किमीपासून ते 90 किमीपर्यंत आहे. 


पिनाका रॉकेटची लाँचिंग यंत्रणा ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार केली आहे. पिनाका डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफ डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑरगायनेझशन ही एलअँडटीच्या मालकीची आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


 


ABP Majha